लॉकडाऊनचा सलून व्यवसायाला मोठा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:11 IST2021-04-14T04:11:16+5:302021-04-14T04:11:16+5:30
गर्दी टाळण्याच्या हेतूने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सलून, ब्युटी पार्लर बंद करण्याचे निर्देश दिल्याने व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले असून, ...

लॉकडाऊनचा सलून व्यवसायाला मोठा फटका
गर्दी टाळण्याच्या हेतूने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सलून, ब्युटी पार्लर बंद करण्याचे निर्देश दिल्याने व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले असून, आता सलून व्यावसायिकांवर पुन्हा उपासमारीची वेळ आली आहे.
सलून दुकाने बंद असल्याने दुकानदार आणि कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या व्यावसायिकांना दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महाळुंगे (ता. खेड) येथील सलून दुकानदार संघटनेने शासनाकडे केली आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने चित्रपटगृह, नाट्यगृहांसह सलून दुकानेही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सलून व्यावसायिकांना आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे. आमच्याही जिवाला धोका आहेच. त्यामुळे नियमावलीत चालक, होम डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण आवश्यक केले आहे. त्याच धर्तीवर सलून व्यावसायिकांनाही लसीकरण करून व्यवसायासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी महाळुंगे येथील नाभिक संघटनेचे पदाधिकारी श्रीधर पांडे, गणेश राऊत, अजय पांडे, हेमंत पांडे, मधुरा कदम यांनी शासनाकडे केली आहे.