शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

'लॉकडाऊन'मुळे जनजीवन होते ठप्प; ठोस शास्त्रीय धोरण आखायला हवे; पुण्यातून मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 6:47 PM

जन आरोग्य अभियानाची मागणी ; आरोग्य सुविधा सक्षम करण्यावर भर द्यावा......

पुणे : कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने सरकारने लॉकडाऊन घोषित केले. कोरोना रोकण्यासाठीचा हा एकमेव उपाय असला तरी त्यासोबत सरकारने  आरोग्य सेवांची उपलब्धता वाढविली पाहिजे, योग्य धोरण ठरवले पाहिजे, मागील एक वर्ष हातात होते, तेव्हा आरोग्य सुविधा सक्षम केल्या असत्या तर आता पुन्हा लॉकडाऊनची पाळी आली नसती. त्यामुळे आता तरी ठोस शास्त्रीय धोरण आखून अंमलबजावणी करावी, अशी मागणी जन आरोग्य अभियानाचे डॉ. अनंत फडके, डॉ. अभय शुक्ला यांनी सरकारकडे केली आहे.

देशातील सर्वच लोक बेजबाबदारपणे वागले असे म्हणणे उथळपणाचे होईल. दुसरे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुकांमधील प्रचार, लग्नकार्ये, जत्रा, सण-समारंभ यामध्ये बेजबाबदारपणाने वागून बहुसंख्य नेेत्याांनी लोकांपुढे चुकीची उदाहरणे घालून दिली. चांगली उदाहरणे पुढाऱ्याांनी घालून दिली असती तर बेजबाबदारपणाची साथ एवढी फोफावली नसती.  एक वर्ष मिळूनही सार्वजनिक आरोग्यसेवेचे वाढीव बजेट, हॉस्पिटल खाटांमध्ये वाढ, त्यांच्यासाठी नवीन डॉक्टर्स व इतर स्टाफ, तसेच अनेकदा चर्चा झालेल्या रिक्त पदांची भरती इ. मार्फत सक्षमीकरणाच्या मागे पडलेल्या कामाला गती देणे हे सरकारने केले नाही.

राज्यभर विविध पातळ्यांवर पुरेशा स्टाफ सकट सक्षम खाटांची संख्या यद-पातळीवर वाढवावी. महाराष्ट्रात दर वर्षी बॉन्ड लिहून दिलेले हजारो डॉक्टर बाहेर पडतात. त्यांना तात्पुरते तरी नेमावे व त्यांना वैद्यकीय महाविद्यालयातून टेलिमेडिसीन द्वारे तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे.—————————-सरकारने काय करायला हवे ?  सामान्य वर्गासाठी मोफत रेशन, वर-खर्चासाठी सरकारकडून बँकेत थेट रोख रक्कम ट्रान्सफर, दरमहा पन्नास युनिट पर्यंत वीज-बिल माफी, असे उपाय केले पाहिजेत.लसीकरण हे महत्वाचे पाऊल आहे. कामगारांसाठी वयोगटाची अट त्वरित शिथिल करून त्यांचे लसीकरण सुरु करावे. पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना ही लस खाजगी हॉस्पिटल्समध्ये सुद्धा मोफत मिळायला हवी.

गावपातळीवर कोरोना समित्या स्थापन कराव्यात. यामध्ये सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकांना अध्यक्ष केले व वैद्यकीय अधिकारी, नर्स ताई, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, आशा व अंगणवाडी कार्यकर्ती, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते इत्यादींचा समावेश करावा.

राज्यस्तरीय तसेच स्थानिक टास्क फोर्स मध्ये पब्लिक हेल्थ तज्ञांचा सुयोग्य सहभाग असायला हवा. नाहीतर अशास्त्रीय आदेश निघतात.   आशा कार्यकर्त्यांना औषधे पुरवली पाहिजेत. सर्व आरोग्य कर्मचाऱ्याना यावर्षी पण विमा संरक्षण मिळाले पाहिजे.  सध्या राज्यात केवळ २०-२५ टक्के रुग्णवाहिका सुस्थितीत आहेत. याकडे गांभीर्याने, प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. —————————————

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसState Governmentराज्य सरकार