दहशत पसरविणारा गुंड स्थानबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:12 IST2021-04-02T04:12:52+5:302021-04-02T04:12:52+5:30
पुणे : लष्कर परिसरात दहशत पसरविणारा सराईत गुन्हेगार प्रदीप ऊर्फ पद्या राम अडागळे (वय २७, रा. सोलापूर बाजार, कॅम्प) ...

दहशत पसरविणारा गुंड स्थानबद्ध
पुणे : लष्कर परिसरात दहशत पसरविणारा सराईत गुन्हेगार प्रदीप ऊर्फ पद्या राम अडागळे (वय २७, रा. सोलापूर बाजार, कॅम्प) याच्यावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एम. पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
प्रदीप अडागळे व त्याच्या साथीदारांनी लष्कर परिसरात कोयता, सत्तूर, चाकू, लोखंडी रॉड अशी हत्यारे बाळगून गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी, बेकायदा शस्त्र बाळगणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील ५ वर्षांमध्ये त्याच्याविरुद्ध ६ गुन्हे दाखल आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम व निरीक्षक कवीदास जांभळे यांनी एमपीडीए कायद्यान्वये अडागळे याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून त्याला एक वर्ष स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी केले.
मागील सहा महिन्यांत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी १७ गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध केले आहे.