शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

'तो' लेफ्टनंट कर्नल असल्याचे सांगून लोकांना गंडा घालायचा; अनेक संशयित वस्तू जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 21:29 IST

लेफ्टनंट कर्नल असल्याचे दाखवून एक व्यक्ती अनेक ठिकाणी फिरत असल्याची व अनेकांना फसवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.

पुणे : लेफ्टनंट कर्नल असल्याचे सांगून अनेकांची फसवणुक करणाऱ्याला ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने एका तोतया आर्मी अधिकाऱ्याला पकडले. 

अंकित कुमार सिंह (वय २३, रा. किरकटवाडी, मुळे हसनपूर, आमरोह, उत्तर प्रदेश) असे या तोतयाचे नाव आहे.  त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १० ओळखपत्रे, २ मोबाईल, एक टॅब, प्रिंटर, लॅपटॉप, मोठ्या प्रमाणावर बनावट कागदपत्रे, लष्कराचा पोषाख , लष्कराची महत्वाची ओळख चिन्हे, लष्करी बुट, पट्टा, लष्कराचे चिन्ह असलेली टोपी असा वस्तू सापडल्या असून पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत. त्याच्या पत्नीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

लेफ्टनंट कर्नल असल्याचे दाखवून एक व्यक्ती अनेक ठिकाणी फिरत असल्याची व अनेकांना फसवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख व पोलीस निरीक्षक पद्याकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, सहायक फौजदार दत्तात्रय जगताप, पोलीस अंमलदार मंगेश भगत, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, काशिनाथ राजापूरे, सुनिता माने यांनी किरकटवाडी येथे सापळा रचून अंकित सिंह याला पकडले़ त्याची पत्नी मीनाक्षी हिलाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने अनेक जणांना फसविले असल्याची शक्यता असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याची सध्या चौकशी सुरु असून त्याने ही ओळखपत्रे व इतर लष्कराची संबंधित वस्तू कोठून आला याची माहिती घेण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय जवानPoliceपोलिसArrestअटक