भरधाव टँकरची ठोस; दुचाकी चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:17 IST2021-02-17T04:17:19+5:302021-02-17T04:17:19+5:30

सुभाष यशवंत गोरे (वय ५०, रा. दावडमळा, आंबेठाण रोड, चाकण) असे अपघात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. बेदरकार ...

Loading tanker concrete; Two-wheeler driver killed | भरधाव टँकरची ठोस; दुचाकी चालक ठार

भरधाव टँकरची ठोस; दुचाकी चालक ठार

सुभाष यशवंत गोरे (वय ५०, रा. दावडमळा, आंबेठाण रोड, चाकण) असे अपघात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.

बेदरकार टँकर चालक शमसुद्दिन आत्मझ मोहम्‍मद रईस (रा. उत्तर प्रदेश) याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष गोरे हे दुचाकीवरून चाकण आंबेठाण रस्त्याने चाकणला जात होते. यावेळी भरधाव वेगात आलेला टँकरने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात सुभाष गोरे जागीच ठार झाले. तात्काळ त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या अपघाताबाबत पुढील तपास चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. कामगार नेते म्हणून परिचित असलेल्या सुभाष गोरे यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण चाकण आणि दावडमळा व झित्राईमळा परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Loading tanker concrete; Two-wheeler driver killed