‘पेंटेंड स्टॉर्क’ला जीवदान

By Admin | Updated: January 13, 2015 05:44 IST2015-01-13T05:44:45+5:302015-01-13T05:44:45+5:30

अन्नाविना अत्यवस्थ झालेल्या करकोचा प्रजातीच्या पक्ष्याला मुळशी तालुक्याच्या माणजवळ घोटावडे येथे सोमवारी जीवदान मिळाले

Lives of Painted Stork | ‘पेंटेंड स्टॉर्क’ला जीवदान

‘पेंटेंड स्टॉर्क’ला जीवदान

पिंपरी : अन्नाविना अत्यवस्थ झालेल्या करकोचा प्रजातीच्या पक्ष्याला मुळशी तालुक्याच्या माणजवळ घोटावडे येथे सोमवारी जीवदान मिळाले. सामाजीक कार्यकर्ते रामचंद्र देवकर यांच्या प्रयत्नातून या पक्ष्याचा बचाव करण्यात आला असून, त्याला वनविभागाकडे सुपूर्त करण्यात आले. आजवर अनेक वन्यजीवांना जीवदान देण्यास प्रयत्न करणाऱ्या देवकर यांचे पंचक्रोषीत कौतूक होत आहे.
माणच्या आयटी पार्कच्या तिसऱ्या टप्याजवळच घोटावडे गावच्या देवकरवाडी येथे रविवारी सायंकाळी एक वेगळाच पक्षी डबक्याच्या काठावर बसल्याचे रामचंद्र देवकर यांनी पाहिले. तो कित्तेक तासांपासून एकाच जागेवर थांबून इतर पक्षांप्रमाणे हालचाल करीत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी जवळ जाण्याचा प्रयत्न केला. तरीही तो पक्षी तेथून उडत नव्हता. त्यामध्ये ताकतच उरली नसल्याचे पारखून देवकर यांनी सोनाली मातेरे, विजय मातेरे, रघुनाथ म्हस्के, शिवकन्या देवकर यांच्या मदतीने या पक्ष्याला पकडले. घराजवळ असलेल्या शेडमधील पक्ष्याच्या जाळीमध्ये सुरक्षित ठेवले. याची माहिती पौड वनपरिक्षेत्र अधिकारी सुधाकर खलाटे यांना दिली. त्यानंतर घोटावडे विभागाचे अधिकारी गावडे व त्यांचे सहकारी देवकरवाडीत दाखल झाले. त्यांनी पक्षी ताब्यात घेवून कात्रज उद्यानातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे उपचारासाठी दाखल केला आहे.
पौड वनपरिक्षेत्राचे अधिकारी खलाटे म्हणाले,‘‘देवकर वाडीत सापडलेला हा पक्षी करकोचा कुळातील ‘ग्रे हेरॉन’ प्रजातीचा असल्याचे प्रथम दर्शनी आढळते. मात्र त्याच्या डोके व चोचीचा भाग इतर करकोचांपेक्षा मोठा आहे. हा पुर्ण वाढ झालेला पक्षी असून, त्याचे अंदाजे वय ५ वर्ष असून या प्रजातीचे आयुर्माण दहा पंधरा वर्ष असते. नाकतोडे, कीटक, मासे, गांडुळ हे त्याचे मुख्य खाद्य आहे. सध्या तो अत्यवस्थ आहे.’’ (वार्ताहर)

Web Title: Lives of Painted Stork

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.