शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

लोकसंस्कृती जपणाऱ्या मरिआईवाल्यांचे जीवन उपेक्षितच

By admin | Updated: January 23, 2017 02:31 IST

अगदी पूर्वापर चालत आलेल्या चालीरीती, रूढी, परंपरा जोपासणारे आपले संस्कृतीपूजक राज्य महाराष्ट्र. गावात व गावगाड्यात

गोलेगाव : अगदी पूर्वापर चालत आलेल्या चालीरीती, रूढी, परंपरा जोपासणारे आपले संस्कृतीपूजक राज्य महाराष्ट्र. गावात व गावगाड्यात ज्याप्रमाणे बारा बलुतेदारांना महत्त्व होते, तसेच महत्त्व मरिआईवाले, नंदीवाले, वासुदेव, पिंगळा, बहुरूपी आदींना होते. भटके जीवन जगणाऱ्या या लोकांचे आजही हलाखीचे व उपेक्षितच जगणे चालू असल्याची वेदना मरिआईवाले सुखदेव रंगप्पा देवकर व त्यांच्या पत्नी शांताबाई यांच्या बोलण्यातून व्यक्त झाली. मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असणाऱ्या पिनौर या छोट्याशा खेडेगावातून आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी हे कुटुंब शेकडो किलोमीटर भटकंती करत आहे. मरिआईचा देव्हारा डोक्यावर घेऊन आलेली महिला व हातातील आसुडाने उघड्या अंगावर फटके मारणारा देवीचा भक्त व त्या आसुडाच्या कडकड आवाजाने भेदून निघणारे आसमंत यामुळे काही काळ सर्वत्र अभेद्य अशी शांतता पसरते. मरिआईवाली महिला आपल्याजवळील ढोलातून गुबुगुबु आवाज काढून देवीच्या दर्शनासाठी येण्याचे आमंत्रण देत असते.(वार्ताहर)४मरिआईची मनोभावे पूजा केल्याने घरातील व गावातील संकट, रोगराई, इडापिडा नष्ट होत असल्याची भावना लोकांमध्ये असते. मरिआईवाले देवीच्या नावाने लोकांना आशीर्वाद देऊन चालू वर्षीच्या पावसाचा अंदाज तसेच संक्रांतीबद्दल माहिती सांगत असल्याने लोक त्यांच्या आगमनाची वाट पाहत असतात. मुलांना आमच्यासारखे वाईट दिवस नकोत म्हणून कर्जतला शासकीय वसतिगृह व शाळेत ठेवले असून तीनही मुले आपल्याजवळ नसल्याची वेदना अश्रुरूपातून जाणवली. त्याचप्रमाणे मुलांना चांगले शिक्षण व नोकरी देण्याची सरकारकडून अपेक्षा असल्याचे बोलून दाखविले. तसेच वाढते शहरीकरण व आधुनिकतेमुळे लोकांना मरिआईचे महत्त्व कमी होऊ लागल्याने पहिल्यासारखी कमाई होत नसल्याचेही सांगितले.