शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात महिलेच्या अवयवदानामुळे दोघांना जीवनदान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 14:22 IST

अपघातामध्ये डोक्याला गंभीर इजा झाल्याने मेंदु मृत झालेल्या ५२ वर्षीय महिलेच्या अवयदानामुळे दोघांना जीवनदान मिळाले आहे.

ठळक मुद्देवरूड गावातील ५२ वर्षीय महिला पतीसह दुचाकीवरून जात असताना अपघात

पुणे : अपघातामध्ये डोक्याला गंभीर इजा झाल्याने मेंदु मृत झालेल्या ५२ वर्षीय महिलेच्या अवयदानामुळे दोघांना जीवनदान मिळाले आहे. या महिलेचे मुत्रपिंड व यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया ससूनमध्ये यशस्वीपणे करण्यात आली. ससूनमध्ये मुत्रपिंडाची ही दहावी व यकृत प्रत्यारोपणाची दुसरी शस्त्रक्रिया ठरली आहे. खटाव तालुक्यातील वरूड गावातील ५२ वर्षीय महिला पतीसह दुचाकीवरून जात असताना अपघात झाला होता. या अपघातात महिलेच्या डोक्याला गंभीर इजा झाली. साताऱ्यात उपचार घेतल्यानंतर महिलेला नातेवाईकांनी ससूनमध्ये दाखल केले. पण उपचारादरम्यान महिलेचा मेंदु मृत झाला. समुपदेशनानंतर नातेवाईकांनी अवयव दानास संमती दर्शविली. महिलेचे मुत्रपिंड इंदापूर येथील ३८ वर्षीय रिक्षा चालकाला देण्यात आले. ते  २०१२ पासून किडनी विकाराने ग्रस्त होते. २०१४ पासून त्यास आठवड्यातून दोन वेळा डायलिसिसवर उपचार घ्यावे लागत होते. कुटुंबामध्ये पत्नी गृहिणी, बारा वर्षाची एक मुलगी व नऊ वर्षाचा मुलगा आहे. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून ससूनमध्ये किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेच्या पथकात डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. राजेश श्रोत्री, डॉ. भालचंद्र काश्यपी, डॉ. अभिजित पाटील आणि डॉ. शंकर मुंढे यांचा समावेश होता.    सातारा जिल्ह्यातील जकातवाडी गावातील ५४ वर्षीय निवृत्त सैनिकावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. ते तीन वर्षांपासून ‘लिव्हर सिरॉसिस’ या आजाराने त्रस्त होते.  खाजगी रुग्णालयात औषधोपचार सुरु होते. ससूनच्या वैद्यकीय सामाजिक अधिक्षक विभागामार्फत ससूनमध्ये यकृत प्रत्यारोपण होत असल्याची त्यांना माहिती मिळाली. म्हणून त्यांनी काही दिवसांपुर्वी ससूनमध्ये यकृत प्रत्यारोपणासाठी नाव नोंदविले होते. या शस्त्रक्रियेच्या पथकात डॉ. मनीष वर्मा, डॉ.मंजुनाथ, डॉ. कमलेश बोकील, डॉ. शीतल धडफळे, डॉ.किरण जाधव, डॉ.संतोष थोरात, भूल तज्ञ डॉ.विद्या केळकर, डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. योगेश गवळी यांचा समावेश होता. डॉ. हरीश टाटिया  व अर्जुन राठोड यांनी सहकार्य केले. -----------  

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलhospitalहॉस्पिटलWomenमहिला