शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरड्यांचे संवादकाव्य पुस्तकरुपातच; ‘मिनूचे मनोगत’मधून कुटुंबाची ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 18:46 IST

‘मिनूचे मनोगत’ मधून आज दुर्मीळ होत असलेले भावंडांचे नातेसंबंध आणि कुटुंबाची करुन दिलेली ओळख अशी संकल्पना रंगवण्यात आली आहे.

ठळक मुद्देविविध प्रकारचे साहित्य चिमुरड्यांसाठी करुन दिले उपलब्धमुलांना वाचनाची गोडी लागेल : संगीता बर्वे

पुणे : ‘पहिल्यांदाच सांगते स्पष्ट, चिनूबद्दल लिहिताना मी खूप घेतलेत कष्ट, पण हे गद्य की पद्य? काही समजत नाहीये बाई! लिहिलंय चांगलं, असं म्हणाली आई’ अशा शब्दांत आपलं म्हणणं मांडणारी मिनू प्रत्येकाला आपल्याच घरातली चिमुरडी आहे, असं प्रत्येकालाच वाटेल. लहान मुलांचे भावविश्व त्यांच्या संवादातून व्यक्त होत असते. चिमुरड्यांचे हेच संवादविश्व पुस्तकाच्या रुपाने वाचकांच्या भेटीला आले आहे. ‘मिनूचे मनोगत’ मधून आज दुर्मीळ होत असलेले भावंडांचे नातेसंबंध आणि कुटुंबाची करुन दिलेली ओळख अशी संकल्पना रंगवण्यात आली आहे.सध्याच्या काळात बालसाहित्यामध्ये खूप कमी लिखाण होत आहे, असे म्हटले जाते. मात्र, ज्येष्ठ बालसाहित्यिका डॉ. संगीता बर्वे यांनी या समजाला छेद देत विविध प्रकारचे साहित्य चिमुरड्यांसाठी उपलब्ध करुन दिले आहे. पियूची वही, नलदमयंती आणि इतर कथा यानंतर त्यांनी ‘मिनूचे मनोगत’ या पुस्तकातून लहान मुलांसाठी संवादकाव्य हा नवा प्रकार हाताळला आहे. संवादकाव्य गमभन प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आले आहे. या नव्या काव्यप्रकारामुळे मुलांना वाचनाची गोडी लागेल आणि त्यांच्याच भावना त्यांच्याच शब्दात मांडल्याने त्या आपल्याशा वाटतील. मुलांना वाचनातील, साहित्यातील अभिरुची वृध्दींगत करायची असेल तर विविध साहित्यप्रकारातून त्यांचे भावविश्व रेखाटायला हवे, अशी गरज संगीता बर्वे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. एक छोटी मुलगी संवादकाव्याच्या रुपाने तिच्या छोटया बहिणीबद्दल लाडिक गोड तक्रारी सांगते आणि त्याचबरोबर कुटुंबाची ओळख करुन देते. ‘स्वल्पविराम, अर्धविराम, अवतरणचिन्ह, उदगारचिन्ह, कुठे नि काय द्यायचं सगळं काढलं शोधून, आईशपथ! खूप अभ्यास करुन’ अशा शब्दांत चिमुरडीने मांडलेली कैैफियत असून, दीपक संकपाळ यांनी पुस्तकातील चित्रे रेखाटली आहेत. सोशल मीडिया, तसेच शाळांच्या माध्यमातून हे पुस्तक घरोघरी पोचवले जाणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :literatureसाहित्यPuneपुणे