सर्कस कलाकारांचे भावविश्व उलगडणारे ‘हे रंग जीवनाचे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:30 AM2017-11-07T00:30:11+5:302017-11-07T00:30:16+5:30

सर्कस या धाडसी पण लोप पावत चाललेल्या कलेमुुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होत असले, तरी सर्कसमध्ये काम करणाºया कलाकारांचे जीवन कसे आहे, त्यांना जीवनात कसा संघर्ष करावा लागतो याचे दृश्य ‘हे रंग जीवनाचे’ या नाट्यप्रयोगातून दाखविण्यात आले.

'This color of life' | सर्कस कलाकारांचे भावविश्व उलगडणारे ‘हे रंग जीवनाचे’

सर्कस कलाकारांचे भावविश्व उलगडणारे ‘हे रंग जीवनाचे’

Next

राज्य नाट्य स्पर्धा
नाशिक : सर्कस या धाडसी पण लोप पावत चाललेल्या कलेमुुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होत असले, तरी सर्कसमध्ये काम करणाºया कलाकारांचे जीवन कसे आहे, त्यांना जीवनात कसा संघर्ष करावा लागतो याचे दृश्य ‘हे रंग जीवनाचे’ या नाट्यप्रयोगातून दाखविण्यात आले.  महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ५७ व्या राज्य हौशी नाट्यस्पर्धेला सोमवार (दि. ६) पासून विजय नाट्यमंडळाची कलाकृती असलेल्या ‘हे रंग जीवनाचे’ या नाट्यप्रयोगाने मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. नाटकाचे लेखक-दिग्दर्शक नेताजी भोईर यांनी त्यांच्या आयुष्यात सर्कसचा बँड वादनकार आणि बँड मास्टर म्हणून आलेल्या अनुभवावर आधारित या प्रयोगाची निर्मिती केली असून, तीसपेक्षा अधिक कलावंतांचा समावेश असलेल्या या नाट्यप्रयोगात सर्कसचा अवघा तंबू यावेळी रंगमंचावर अवतरल्याचा भास प्रेक्षकांना झाला. सर्कशीतील विदूषक, वेगवेगळे प्राणी आणि पक्षी, जादुगार यांसह दोरीवरून उड्या मारणाºया युवती असे सगळेच सर्कशीला साजेसे दृश्य नाटकातून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला.  एकीकडे सर्कशीतील कलावंत प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतानाच दुसरीकडे मात्र पडद्यामागे कलाकारांची जीवनाच्या संघर्षासाठी सुरू असलेली धडपड मिळणारा क्षणभराचा वेळ किती महत्त्वाचा ठरतो हे दाखविण्याचा प्रयत्न या प्रयोगातून सादर करण्यात आला. शनिवार, दि. २५ पर्यंत चालणाºया नाट्यप्रयोगांचा नाट्यप्रेमींनी आस्वाद घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
आज सादर होणारे नाटक -  ‘विच्छा माझी पुरी करा’
संस्था : सूर्या, सामाजिक युवा कला केंद्र. वेळ : संध्याकाळी ७ वाजता

Web Title: 'This color of life'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.