साहित्य पत्रिका मिळणार ‘आॅनलाइन’
By Admin | Updated: January 7, 2015 23:04 IST2015-01-07T23:04:09+5:302015-01-07T23:04:09+5:30
साहित्य परिषदेचे मुखपत्र असलेल्या महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचा अंक आता आॅनलाईन उपलब्ध होणार आहे.

साहित्य पत्रिका मिळणार ‘आॅनलाइन’
पुणे : साहित्य परिषदेचे मुखपत्र असलेल्या महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचा अंक आता आॅनलाईन उपलब्ध होणार आहे. केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच नव्हे तर मराठी भाषाप्रेमींनाही हा अंक घरबसल्या एका क्लिकवर पहाता येणार आहे.
आगामी काळात ‘टेक्नोसॅव्ही’ तरूण पिढीसाठी सध्याच्या या पत्रिकेच्या आॅनलाईन चेहरामोहऱ्यातही सुधारणा करण्याचे संपादकीय मंडळाच्या विचाराधीन असून, त्याला नव्या स्वरूपात आणण्यावर भर दिला जाणार आहे.
मराठी साहित्य विश्वात आद्यसंस्था म्हणून परिचित असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेनेच केवळ नव्हेतर त्याचे मुखपत्र असलेल्या महाराष्ट्र साहित्य पत्रिकेनेही शताब्दीपूर्तीकडे आपली वाटचाल केली आहे. एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाचे युग आहे. ई-बुक्सच्या या जमान्यात साहित्य पत्रिकेसारखी मुखपत्र कितीवर्षे तग धरू शकतील, हा प्रश्न आहे.
नव्या पिढीची वैचारिक भूक भागविण्याबरोबरच तरूणाई देखील या साहित्य पत्रिकेशी जोडली जावी या हेतूने साहित्य पत्रिका ही आॅनलाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मुळे अंकाच्या प्रती छापण्याचा खर्चही काही प्रमाणात टळणार आहे. सदस्यांना अंक पाठवूनही ते मिळत नाहीत या तक्रारींनाही यामुळे काहीप्रमाणात आळा बसणार आहे. साहित्य पत्रिकेचा अंक सदस्यांसह सर्व वाचकांना ६६६.ेंँं१ं२ँ३१ं२ंँ्र३८स्रं१्र२ँं.िङ्म१ॅ या साहित्यपरिषदेच्या संकेतस्थळावर पीडीफ स्वरूपात उपलब्ध करून दिला जाणार आहे.
आॅक्टोबर ते डिसेंबर हा त्रैमासिक अंक संकेतस्थळावर पहाता येईल. परिषदेचे अनेक ज्येष्ठ सदस्य आहेत, नोंदणी केल्यानंतर अंकाच्या प्रती त्यांना उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे संपादक महेंद्र मुंजाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
सध्या साहित्य परिषदेचे संकेतस्थळ अपडेट करण्याचे काम सुरू आहे. दोन दिवसात हा अंक आॅनलाईन उपलब्ध करून दिला जाईल. सदस्यांव्यतिरिक्त ही वाचकांना डाऊनलोड करून हा अंक पहाता यईल. ज्या सदस्यांना प्रिंट कॉपी नको आहे, त्यांनाही मेलद्वारे हा अंक पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
-महेश मुंजाळ