शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
4
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
5
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
6
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
7
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
8
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
9
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
10
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
11
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
12
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
13
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
14
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
15
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
16
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
17
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
18
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
19
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
20
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक

साहित्यिकांनी एका व्यक्तीच्या पायाशी विवेक गहाण ठेवू नये - फादर फ्रान्सिस दिब्रिटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 02:49 IST

सहिष्णूता हा भारतीयांचा धर्म असून असहिष्णूता हा अपघात आहे. साहित्यिक, विचारवंतांची शारीरिक आणि वैचारिक हत्या केली जात आहे, हे खेदजनक आहे.

पुणे : सहिष्णूता हा भारतीयांचा धर्म असून असहिष्णूता हा अपघात आहे. साहित्यिक, विचारवंतांची शारीरिक आणि वैचारिक हत्या केली जात आहे, हे खेदजनक आहे. कोणा एका व्यक्तीच्या पायाशी स्वाभिमान, अस्तित्व आणि विवेक गहाण न ठेवता साहित्यिकांनी वेळोवेळी भूमिका घेऊन आवाज उठवत, ‘राजा तू नागडा आहेस’ हे ठणकावून सांगितले पाहिजे. सहिष्णू भारतात गाय महत्त्वाची की माणूस हे ठरवावे लागेल. काँग्रेसमुक्त आणि भाजपमुक्त भारत अशा गोष्टींपेक्षाही आपल्याला भीतीमुक्त आणि द्वेषमुक्त भारत हवा आहे, अशा शब्दांत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी सद्यस्थितीवर निशाणा साधला. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या विचारवंतांच्या खूनसत्रानंतर आत्माविष्कार करण्यासाठी कलाकार आणि साहित्यिक मुक्त आहेत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित १८ व्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात दिब्रिटो बोलत होते. नाट्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. खासदार सुप्रिया सुळे, प्रसिद्ध शिल्पकार सुनील देवरे, संयोजक दिलीप बराटे आणि काका चव्हाण उपस्थित होते. साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्षदिलीप बराटे यांनी प्रास्ताविककेले.प्रतिष्ठानचे सचिव वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. देवेंद्र सूर्यवंशी यांनी आभार मानले.हिंसाचाराने विचारवंतांचा कोंडमारा होतो1या देशातील सामान्य माणूस लोकशाहीचा संरक्षक आहे. परंतु, दुर्दैवाने अधूनमधून आपल्याकडे विचारांची गंगा उलट दिशेने वाहू लागते. आपला प्रवास असहिष्णुतेकडे, संकुचितपणाकडे, ठोकशाही आणि अराजकतेच्या दिशेने होऊ लागतो. काहींच्या भावना पटकन दुखावल्या जातात. धर्म, जात, भाषा, प्रांत, ऐतिहासिक व्यक्तींविषयी चिकित्सक भाष्य केले की संबंधित गट उजळून उठतात. कायदा हाती घेऊन प्रसंगी हिंसाचाराचा अवलंब करतात. विभूतीपूजा, कर्मठपणा आणि पोथीनिष्ठा वाढत असल्याने हाडाच्या संशोधकांची कुचंबणा आणि विचारवंतांचा कोंडमारा होतो, असे दिब्रिटो म्हणाले.2 गज्वी म्हणाले, ‘प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवत घराबाहेर संविधान हाच आधार मानला पाहिजे. हिंदू राष्ट्राचा आग्रह धरला जात असल्याने संविधान मूल्यांना तडा जात आहे. संभ्रमित अवस्था निर्माण करून सामान्यांचा गोंधळ उडविण्याचे काम केले जात आहे.’आपली आणि उद्याची पिढी यांच्यात साहित्याची सांगड घालणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या मातीत सांस्कृतिक समृद्धीची, साहित्याची बीजे पेरलेली आहेत. लोकशाहीचे मंदिर असलेल्या लोकसभेमध्ये सत्ताधारी फारसे अनुकूल नसतानाही आम्ही समलिंगी संबंधांना आणि सरोगसी विषयाचे विधेयक संमत करून घेतले. राष्ट्रवादीकडून आगामी निवडणुकीत एका तरी तृतीयपंथीला तिकीट दिले जाईल, असा आग्रह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे धरणार आहे.- सुप्रिया सुळे 

टॅग्स :Puneपुणे