सयाजीराव गायकवाड पुरस्कारासाठी साहित्यिक बबन पोतदार यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:12 IST2021-04-27T04:12:04+5:302021-04-27T04:12:04+5:30

पुणे : बडोदा (गुजरात) येथील मराठी वाङ्मय मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या ‘महाराजा सयाजीराव गायकवाड’या सन्मानाच्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ साहित्यिक बबन ...

Literary Baban Potdar selected for Sayajirao Gaikwad Award | सयाजीराव गायकवाड पुरस्कारासाठी साहित्यिक बबन पोतदार यांची निवड

सयाजीराव गायकवाड पुरस्कारासाठी साहित्यिक बबन पोतदार यांची निवड

पुणे : बडोदा (गुजरात) येथील मराठी वाङ्मय मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या ‘महाराजा सयाजीराव गायकवाड’या सन्मानाच्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ साहित्यिक बबन पोतदार यांची निवड करण्यात आली आहे. पोतदार यांच्या मराठी साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, रोख रक्कम, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

पोतदार यांनी विविध प्रकारचे लेखन केले असून, त्यांची विविध पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यामध्ये गुंजेचा पाला, आक्रित, एका सत्याचा प्रवास हे कथासंग्रह, गुंतले हृदय माझे या चित्रपटाचे लेखन, दूरदर्शन आणि आकाशवाणी केंद्रावरील विविध कौटुंबिक श्रुतिकांचे लेखन, वेगवेगळ्या वृत्तपत्रातून स्तंभलेखन, दिवाळी अंक, मासिके, लघुकथा यांचा समावेश आहे.

----------------------------------------------------------

Web Title: Literary Baban Potdar selected for Sayajirao Gaikwad Award