वाडेकर-बागवे यांच्यात शाब्दिक चकमक
By Admin | Updated: September 29, 2014 23:43 IST2014-09-29T23:43:24+5:302014-09-29T23:43:24+5:30
कॅँन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार परशुराम वाडेकर यांनी प्रतिज्ञापत्रत खोटी माहिती सादर केल्याची तक्रार एका उमेदवाराने केली.

वाडेकर-बागवे यांच्यात शाब्दिक चकमक
>पुणो : कॅँन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार परशुराम वाडेकर यांनी प्रतिज्ञापत्रत खोटी माहिती सादर केल्याची तक्रार एका उमेदवाराने केली. त्यानंतर वाडेकर यांचा उमेदवारा अर्ज बाद ठरविण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी अर्ज छाननीच्या वेळी केली. मात्र, ही टायपिंग मिस्टेक असल्याने, तसेच प्रतिज्ञापत्रतील चुकीबाबत आपल्याला निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याचे सांगून निवडणूक निर्णय अधिका:यांनी बागवे यांची मागणी फेटाळून लावली.
यामुळे वाडेकर आणि बागवे यांच्यामध्ये निवडणूक निर्णय अधिका:यांसमोरच शाब्दिक चकमक झडली. त्यामुळे छननीच्या वेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
विधानसभा उमेदवारीच्या अर्जाची छाननी सकाळी अकराच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम पाटील यांच्यासमोर सुरू झाली. या वेळी उमेदवार असलेले गणोश शेंडगे यांनी वाडेकर यांच्या प्रतिज्ञापत्रत चुकीचा पत्ता दिल्याचा आक्षेप घेतला. त्यानंतर हा मुद्दा धरून बागवे यांनी वाडेकर यांचा अर्ज अपात्र करण्याची जोरदार मागणी केली. प्रतिज्ञापत्रत खोटी माहिती दिली असून, हा गुन्हा असल्याचे बागवे म्हणाले. मात्र, आपल्या अर्जात योग्य माहिती दिली असून, प्रतिज्ञापत्रत नजरचुकीने आणि प्रिंटिंग मिस्टेकमुळे ही गडबड झाली असल्याचे वाडेकर यांनी सांगितले. तर, निवडणूक कायद्याअंतर्गत यामुळे अर्ज बाद करता येणार नसल्याचे पाटील यांनी बागवे यांच्या निदर्शनास आणून दिले.
तसेच, प्रतिज्ञापत्रबाबतचे अधिकार आपल्याला नसून, त्याबाबत न्यायालयात तक्रार करता येईल, असे पाटील यांनी सांगितले. त्यानंतरही बागवे यांनी आपली मागणी लावून धरली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अखेर वाडेकर पात्र असल्याचे पाटील
यांनी जाहीर केले. दरम्यान, याबाबत
परशुराम वाडेकर आणि अविनाश बागवे
यांच्याशी संपर्क साधला; मात्र तो होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)