राष्ट्रवादी कॉँग्रेसची यादीही आज
By Admin | Updated: February 1, 2017 05:11 IST2017-02-01T05:11:12+5:302017-02-01T05:11:12+5:30
राष्ट्रवादी कॉँग्रेसची पहिली यादी बुधवारी (दि. १) जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांनी दिली. कॉँग्रेसबरोबरची आघाडी होण्याची शक्यता फारशी नाही.

राष्ट्रवादी कॉँग्रेसची यादीही आज
राष्ट्रवादी कॉँग्रेसची पहिली यादी बुधवारी (दि. १) जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांनी दिली.
कॉँग्रेसबरोबरची आघाडी होण्याची शक्यता फारशी नाही. अनेक प्रभागांतील काही जागांवर वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांतील बोलणी खुंटली आहेत. दोन्ही पक्षांच्या इच्छुक उमेदवारांचीही आता आघाडी नाही, अशी खात्री झाली आहे. उमेदवारी मिळण्याची शक्यता वाढल्यामुळे त्यांच्याकडून याचे स्वागतच करण्यात येत आहे. मात्र, इतके दिवस उगीचच खेळवले असल्याचा संतापही त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.