काँग्रेसची यादी उद्या जाहीर होणार
By Admin | Updated: February 1, 2017 05:12 IST2017-02-01T05:12:33+5:302017-02-01T05:12:33+5:30
राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबरची आघाडी तुटल्यातच जमा असल्याने कॉँग्रेसतर्फे प्रभागनिहाय नावनिश्चिती सुरू करण्यात आली आहे. उमेदवारांची यादी गुरुवारी (दि. २ फेब्रुवारी) जाहीर

काँग्रेसची यादी उद्या जाहीर होणार
पुणे : राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबरची आघाडी तुटल्यातच जमा असल्याने कॉँग्रेसतर्फे प्रभागनिहाय नावनिश्चिती सुरू करण्यात आली आहे. उमेदवारांची यादी गुरुवारी (दि. २ फेब्रुवारी) जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी दिली.
काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक सोमवारप्रमाणेच मंगळवारीही मुंबईत दिवसभर सुरू होते. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह वरिष्ठ नेत्यांसोबत पुण्यातील पदाधिकारी बैठकीसाठी मुंबईतच होते. त्यांनी छाननी समितीने सादर केलेल्या उमेदवारांची प्रभागनिहाय नावनिश्चिती सुरू केली आहे.