शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिकेला आधार जोडणीचे काम पुण्यात वेगाने; गरजू नागरिकांना लाभ मिळण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 14:33 IST

शिधापत्रिकेला आधारकार्ड जोडणी बंधनकारक करण्यात आल्यानंतर या कामाला सुरुवात करण्यात आली असून शहरातील अंत्योदय कार्डधारकांची ६० टक्के आणि अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांची ८४ टक्के आधार जोडणी झाली आहे.

ठळक मुद्देस्वस्त धान्य ग्राहकांना आधार जोडणी बंधनकारकभ्रष्टाचार रोखण्यासाठी स्वस्त धान्य दुकानांमध्ये बसविण्यात आली पॉर्इंट आॅफ सेल (पॉस) यंत्रेआधारकार्ड जोडलेले नसल्यास वितरित केले जाणार नाही धान्य

पुणे : शिधापत्रिकेला आधारकार्ड जोडणी बंधनकारक करण्यात आल्यानंतर या कामाला सुरुवात करण्यात आली असून शहरातील अंत्योदय कार्डधारकांची ६० टक्के आणि अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांची ८४ टक्के आधार जोडणी झाली आहे. गरजू नागरिकांनाच स्वस्त धान्य योजनेचा लाभ मिळावा आणि या धान्याचा बाळाबाजार रोखण्यासाठी केंद्र शासनाने आधार जोडणी करणे बंधनकारक केले आहे. स्वस्त धान्य ग्राहकांना आधार जोडणी बंधनकारक करण्यात आली. भ्रष्टाचार रोखण्यासाठी स्वस्त धान्य दुकानांमध्ये पॉर्इंट आॅफ सेल (पॉस) यंत्रे बसविण्यात आली आहेत. केंद्र सरकार प्रतिवर्षी अन्नधान्याच्या अनुदानापोटी १ लाख ४० हजार कोटी रुपये खर्च करते. हे अनुदान योग्य व्यक्तींपर्यंत जाण्यासाठी आधारची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरसाठी आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आला होता. जिल्ह्यामध्ये ४० टक्केच अंत्योदय कार्डधारकांची आधार जोडणी झाली आहे, तर शहरातील १२ हजार ५७७ अंत्योदय कार्डधारकांपैकी ७ हजार ५३३ म्हणजेच ६० टक्के लोकांची आधार जोडणी झाली आहे. तर ३ लाख ३८ हजार २२२ अन्नसुरक्षा कार्डधारकांपैकी २ लाख ८४ हजार ३४९ लोकांचे आधार प्रमाणीकरण झाले असून त्याची आकडेवारी ८४ टक्के आहे. आधारकार्ड जोडलेले नसल्यास धान्य वितरित केले जाणार नाही.  

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डPuneपुणे