एक व दोन व्यक्तींच्या कुटूंबांनाही मिळणार अंत्योदय शिधापत्रिका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 06:46 PM2017-11-30T18:46:34+5:302017-11-30T18:48:40+5:30

जिल्हा पुरवठा अधिका-यांनी मालेगाव तहसीलदारांमार्फत पत्र पाठवून एक व दोन व्यक्तींच्या कुटूंबांना पुर्वीप्रमाणेच अंत्योदय शिधापत्रिका दिल्या जातील, असे कळविले आहे.

Antodaya ration card for one or two people | एक व दोन व्यक्तींच्या कुटूंबांनाही मिळणार अंत्योदय शिधापत्रिका!

एक व दोन व्यक्तींच्या कुटूंबांनाही मिळणार अंत्योदय शिधापत्रिका!

Next
ठळक मुद्देवामराव देशमुख यांचा पाठपुरावालाभार्थींमध्ये आनंदाचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम): काँग्रेस शासनाच्या कार्यकाळात केवळ एक व दोन व्यक्तींच्या कुटूंबांना अंत्योदय शिधापत्रिका देण्यात आली; परंतु विद्यमान शासनाने हा प्रकार बंद केला होता. दरम्यान, नेहरू ब्रिगेडचे कार्याध्यक्ष विनायकराव देशमुख यांनी यासंदर्भात थेट मुख्यमंत्री, प्रधानमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करून उपोषणाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेण्यात आली असून जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी मालेगाव तहसीलदारांमार्फत पत्र पाठवून एक व दोन व्यक्तींच्या कुटूंबांना पुर्वीप्रमाणेच अंत्योदय शिधापत्रिका दिल्या जातील, असे कळविले आहे. वामनराव देशमुख यांनी ३० नोव्हेंबरला ही माहिती दिली.
एक व दोन व्यक्ती असलेल्या कुटूंबांना दिलेल्या अंत्योदय शिधापत्रिका रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात विनायकराव देशमुख यांनी शासनस्तरावर सलग पाठपुरावा केला. त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांनी जिल्हा पुरवठा अधिकारी आणि तहसीलदारांमार्फत देशमुख यांना पत्र पाठवून एक व दोन व्यक्तींच्या कुटूंबांना लवकरच शिधापत्रिका देण्याची कार्यवाही केली जाईल. यासंदर्भातील माहिती संबंधित तलाठ्यांकडून तपासणी करून अंतिम करण्यात येईल, असे कळविले आहे.
दरम्यान, विनायकराव देशमुख यांच्या सलगच्या पाठपुराव्यामुळेच राज्यातील एक व दोन व्यक्तीच्या  कुटूंबांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून या निर्णयामुळे लाभार्थींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
 

Web Title: Antodaya ration card for one or two people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न