आयएमईडीला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे लीलावती पारितोषिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:11 IST2021-04-13T04:11:22+5:302021-04-13T04:11:22+5:30

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. एम. ...

Lilavati Award of All India Council of Technical Education to IMED | आयएमईडीला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे लीलावती पारितोषिक

आयएमईडीला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे लीलावती पारितोषिक

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. एम. पी. पुनिया, एसटीडीसीचे संचालक डॉ. अमित कुमार श्रीवास्तव, सहसंचालक संजू चौधरी, सदस्य राजीव कुमार उपस्थित होते.

एक लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप होते. डॉ. कीर्ती गुप्ता यांच्या संमवेत श्वेता ताटे, डॉ. रजिता दीक्षित, डॉ. अनुराधा येसुगडे, डॉ. हेमा मिरजी, पल्लवी चोपडे यांनी डिजिटल लिटरसी टीममध्ये काम केले.

या स्पर्धेसाठी देशभरातून ४५६ प्रवेशिका आल्या होत्या. या यशाबद्दल भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, कुलसचिव जी. जयकुमार यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

Web Title: Lilavati Award of All India Council of Technical Education to IMED