पालखीवरील झाडांवर वीज कोसळली; शिरूरमध्ये वारकरी बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2022 21:27 IST2022-06-26T21:27:15+5:302022-06-26T21:27:28+5:30
परभाणे हॉस्पिटलशेजारील घरांमधील टीव्ही, फ्रीज सारखी उपकरणे जळाली आहेत. मंदिरात आरती सुरु असल्याने वारकऱ्यांना कोणताही इजा झाली नाही.

पालखीवरील झाडांवर वीज कोसळली; शिरूरमध्ये वारकरी बचावले
रांजणगाव सांडस: वडगाव रासाई ता शिरूर येथील सद्गुरु जगन्नाथ काकडे महाराज यांची पालखी आज प्रस्थान झाली. मात्र, यावेळी वाटेत पालखीजवळील झाडावर वीज पडल्याने मोठी खळबळ उडाली होती.
ग्रामस्थ वारकरी टाळ-मृदुंगाच्या साह्याने काकडे महाराज दिंडीचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने मार्गस्त झाले. यावेळी अचानक दुपारच्या वेळेस विजेचा कडकडाट झाला. त्या वेळेस पालखी सोहळाच्या काही अंतरावर काकडे महाराजांच्या आरती सोहळा सुरू होता. एकाच वेळी जांभूळ व नारळावर झाडावर वीज पडली. नारळाच्या झाडाने पेट घेतला . जांभळाच्या झाडाजवळ पालखी रथ होता.
परभाणे हॉस्पिटलशेजारील घरांमधील टीव्ही, फ्रीज सारखी उपकरणे जळाली आहेत. मंदिरात आरती सुरु असल्याने वारकऱ्यांना कोणताही इजा झाली नाही.