विजेचा लपंडाव सुरूच!

By Admin | Updated: May 22, 2014 06:13 IST2014-05-22T06:13:51+5:302014-05-22T06:13:51+5:30

हडपसर परिसरात गेल्या महिनाभरापासून विजेचा लपंडाव सुरु असून, नागरिकांना सतत भारनियमनाला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार महावितरणच्या मुख्य अभियंत्यांकडे करण्यात आली आहे

Lightning hiding | विजेचा लपंडाव सुरूच!

विजेचा लपंडाव सुरूच!

पुणे : हडपसर परिसरात गेल्या महिनाभरापासून विजेचा लपंडाव सुरु असून, नागरिकांना सतत भारनियमनाला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार महावितरणच्या मुख्य अभियंत्यांकडे करण्यात आली आहे. हडपसरमधील ग्राहक शीला स्वामी यांनी गेल्या महिनाभरात या परिसरात झालेल्या बत्ती गुल्लची माहिती मुख्य अभियंत्यांना पाठविली आहे. एप्रिल महिन्यातील २४, २७, २९, मे महिन्यातील १, २, १५, १६ व २० तारखेला किती वेळ व कोणत्या वेळी भारनियमन झाले याची माहिती देखील तक्रार अर्जात देण्यात आली आहे. सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर म्हणाले, काही भागात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. इन्फ्रा प्रकल्पांतर्गत पायाभूत सुविधांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. असे असतानाही वीज पुरवठा सातत्याने विस्कळीत होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या कामांच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Lightning hiding