शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांच्या आयुष्यात प्रकाश फुलेल : गिरीश बापट, लाईट हाऊस उपक्रमाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 22:07 IST

केंद्र सरकारने स्किल इंडिया अतंर्गत बेरोजगार, अल्पशिक्षित व शिक्षित युवक युवतींना विविध व्यवसायांचे मार्गदर्शन सुरू केले आहे. लाईट हाऊस हा तसाच प्रकल्प आहे.

ठळक मुद्देदरवर्षी सर्वसाधारण स्तरातील किमान ७५० विद्यार्थी या केंद्रामधून पूर्ण प्रशिक्षित होऊन बाहेर पडणार

पुणे: बेरोजगार युवक-युवतींना आयुष्यात एक दिशा हवी असते, प्रकाश हवा असतो. महापालिका व पुणे सिटी कनेक्ट यांच्या संयुक्त उपक्रमातून सुरू करण्यात आलेल्या लाईट हाऊस मुळे त्यांना हा प्रकाश मिळेल व त्याच्या जीवनात सोनेरी पहाट उमलेल, असा विश्वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला.प्रभाग क्रमांक ३१ वारजे मधील या लाईट हाऊसचे उद्घाटन बापट यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. भाजपाचे आमदार भीमराव तापकीर,भाजपा शहराध्यक्ष योगेश गोगावले, नगरसेवक राजाभाऊ बराटे, शिवराम मेंगडे, सुजय कालेले आदी यावेळी उपस्थित होते. बापट म्हणाले, केंद्र सरकारने स्किल इंडिया अतंर्गत बेरोजगार, अल्पशिक्षित व शिक्षित युवक युवतींना विविध व्यवसायांचे मार्गदर्शन सुरू केले आहे. लाईट हाऊस हा प्रकल्पही तसाच आहे. काही संस्थांनी एकत्र येऊन अशा प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देणे हा समाजव्यवस्थेचा भाग आहे.पुणे सिटी कनेक्ट च्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूची माथून यांनी महापालिकेच्या विविध समाजपयोगी उपक्रमांसाठी शहरातील वेगवेगळ्या कंपन्या नेहमीच साह्य करत राहतील असा विश्वास व्यक्त केला. लाईट हाऊस द्वारे घेतल्या जाण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची,अभ्यासक्रमांची त्यांनी माहिती दिली. दरवर्षी सर्वसाधारण स्तरातील किमान ७५० विद्यार्थी या केंद्रामधून पूर्ण प्रशिक्षित होऊन बाहेर पडतील असे त्या म्हणाल्या.नगरसेवक सुशील मेंगडे यांनी प्रास्तविक केले. आमदार तापकीर व अन्य पाहुण्याची यावेळी भाषणे झाली. अमृता बहुलेकर यांनी सुत्रसंचालन केले. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी आभार मानले. 

टॅग्स :PuneपुणेWarje Malwadiवारजे माळवाडीgirish bapatगिरीष बापटBJPभाजपा