संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत
By Admin | Updated: August 1, 2014 05:44 IST2014-08-01T05:38:20+5:302014-08-01T05:44:09+5:30
मावळ, मुळशी, हवेली तालुका तसेच पिंपरी-चिंचवड शहर परिसरात चौथ्या दिवशीही संततधार सुरूच आहे.

संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत
पिंपरी : मावळ, मुळशी, हवेली तालुका तसेच पिंपरी-चिंचवड शहर परिसरात चौथ्या दिवशीही संततधार सुरूच आहे. त्यामुळे पवना, इंद्रायणी, मुळा या नद्यांना पूर आलेला आहे.
पावसामुळे शहरवासियांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाळी गटरयोजना कुचकामी ठरल्याने चौकाचौकात पाण्याची तळी दिसून आली. तसेच पावसामुळे चिंचवड परिसरातील वीज पुरवठा बारा तास बंद होता. मोरवाडी चौकातील ग्रेड सेपरेटरमध्ये पाणी साचल्याने दुसऱ्या दिवशीही ग्रेड सेपरेटर बंद होता. त्यामुळे वाहतुककोंडीचा सामना चालकांना करावा लागला. हिंजवडीतील
पुलावरून पाणी जात असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली होती. (प्रतिनिधी)