शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

पुण्यात जनजीवन सुरळीत; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 11:48 AM

भीमा कोरेगाव घटना आणि त्यानंतर भारिप बहुजन महासंघाने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेच्या पार्श्वभूमीवर पुणे परिसरातील जनजीवन सुरळीत व शांततेत आहे.

ठळक मुद्देशहरातील अनेक शाळा आज बंद, महत्त्वाच्या चौकांत पोलीस बंदोबस्तस्वारगेट बसस्थानकाचा परिसर आज मात्र शांत

पुणे : भीमा कोरेगाव घटना आणि त्यानंतर भारिप बहुजन महासंघाने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेच्या पार्श्वभूमीवर पुणे परिसरातील जनजीवन सुरळीत व शांततेत आहे.शहरातील अनेक शाळा आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. कात्रज, बिबवेवाडी सहकारनगरमधील शाळा बंद आहेत. बहुतांशी ठिकाणची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. पोलिसांनी शांततेचे तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केल्यानंतर पुणेकरांनीही त्यास प्रतिसाद देत शांतता राखण्यास प्राध्यान्य दिल्याचे शहरातील परिस्थितीवरून दिसून येत आहे. महत्त्वाच्या चौकांत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पीएमपीने आज आपली सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने बंदमुळे प्रवाशांची संभाव्य गैरसोय टळण्यास मदत झाली आहे. नेहमीच गजबज असणारा स्वारगेट बसस्थानकाचा परिसर आज मात्र शांत दिसत होता.  महत्त्वाच्या सेवा यामध्ये रुग्णालये, बँका सुरू असून कामकाज सुरळीत असल्याचे समजते. शांततेत लाँग मार्च काढणार असल्याचे महाराष्ट्र लोकशाही आघाडी, डावी आघाडी, जातीअंत परिषद, भारिप बहुजन महासंघ, भिमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभिमान समिती पुणे, शनिवारवाडा एल्गार परिषद पुणे, पुणे शहर जिल्हातील सर्व पुरोगामी पक्ष-संघटना आदी संघटनांतर्फे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावswargate bus depotस्वारगेट बसस्थानकPuneपुणे