जन्मठेपेचा कैदी येरवड्यातून पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:37 IST2020-11-22T09:37:48+5:302020-11-22T09:37:48+5:30

पुणे : जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला अजय पिटर तोपून हा कैदी येरवडा कारागृहातून पळाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी ...

The life-long prisoner escaped from Yerwada | जन्मठेपेचा कैदी येरवड्यातून पळाला

जन्मठेपेचा कैदी येरवड्यातून पळाला

पुणे : जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला अजय पिटर तोपून हा कैदी येरवडा कारागृहातून पळाल्याची घटना समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तोपून याला येरवडा खुल्या कारागृहात शेतीची कामे दिली असताना नैसर्गिक विधीच्या बहाण्याने त्याने पळ काढला. पौड पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यावरून त्याला शिक्षा झाली होती. येरवडा कारागृहात तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. सहायक पोलीस निरीक्षक बनसवडे पुढील तपास करीत आहेत.

-------------------------------------------------------------

Web Title: The life-long prisoner escaped from Yerwada