शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकराची कमाल! घराच्या टेरेसवर फुलपाखरू गार्डनचे संवर्धन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 11:57 IST

गच्चीवर अनुभवता येतोय फुलपाखरांचा जीवनक्रम आणि त्यांची वर्तणूक....

पुणे : फुलपाखरू दिसायला सुंदर दिसते, पण ते रूप मिळण्यासाठी त्याला अनेक अवस्थेतून जावे लागते. फुलपाखरांच्या या जीवनक्रमाचा अंतर्भाव शालेय अभ्यासक्रमात सुद्धा केलेला आहे. फुलपाखराने अंडी घातली की त्यातून अळी बाहेर येते. अन‌् मग अळीचा कोष तयार होतो. या कोषातून सुंदर असे फुलपाखरू बाहेर येते. हा फुलपाखराचा जीवनक्रम मुलांना प्रत्यक्ष निरीक्षणातून अनुभवता यावा यासाठी फुलपाखरू संशोधक डॅा. अंकूर पटवर्धन यांनी गच्चीवर फुलपाखरांसाठी गार्डन तयार केले आहे. 

या गार्डन मध्ये फुलपाखरांच्या जीवनक्रमाबरोबरच त्यांचा विशिष्ठ फुलांवर बसण्याचा कालावधी, फुलपाखरे किती वेळा कुठल्या फुलांवर बसतात?, त्यांना कुठले परागकण चिकटतात?  ऋतुमानानुसार त्यांना आवडणारी झाडे कुठली आहेत? इत्यादि बाबींचे संशोधन चालू आहे. डॅा. पटवर्धन गेली अनेक वर्षे फुलपाखरांचा अभ्यास करत आहेत तसेच ते आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील अण्णासाहेब कुलकर्णी जैवविविधता विभागाचे प्रमुख आहेत. गेल्या दीड वर्षांपासून त्यांनी हे गार्डन जपले आहे. फुलपाखरांसाठी आवश्यक असणारी सर्व वनस्पती त्यांनी गार्डनमध्ये जतन केल्या आहेत.

मादी फुलपाखरू त्यांना आवडत्या वनस्पतीवर अंडी घालते. प्रजाती नुसार अंड्यातून आठवड्याभरात छोट्या आळ्या बाहेर येतात. आळ्या दोन-तीन आठवडे वनस्पतीची पानं खूप खातात. त्यानंतर खाणं थांबवून ते स्वत:भोवती कोष तयार करतात. एक चिकट लाळेच्या दोऱ्याने आळी स्वत:ला फांदीवर, देठावर चिटकवते व कोष अवस्थेत जाते. या काळात काही खात नाही. सात ते पंधरा दिवसांनी कोषातून फुलपाखरू बाहेर येते. आजूबाजूचे पर्यावरण, हवामान यानुसार हा कालावधी कमी जास्त होतो.- डॅा. अंकुर पटवर्धन   हे लावा फुलपाखरं येतील...फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी तेरडा, टणटणी, डिंगळा, भूरूंडी, झेंडू, अबोली, चित्रक, हळदीकुंकू, कोरांटी, रुई, कृष्णकमळ, कण्हेर, कढीपत्ता, लिंबू, सोनचाफा, वनस्पती घराच्या, शाळेच्या आवारात लावल्यास फुलपाखरे त्या ठिकाणी येतील.      

 

टॅग्स :Puneपुणे