शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

जगणं कठीण झालं म्हणून 'त्या' चौघांनी आत्महत्या करण्यासाठी विहिरीत उडी मारली,पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 18:37 IST

हातचं काम केलं, जगायचं कसं हा प्रश्न उभा राहिला मग त्यांनी मरणाला जवळ करण्याचा प्रयत्न केला...

पुणे : कोरोनामुळे हातचा रोजगार गेला, आता कुणी काम देईना, यापुढे जगायचं कसं, दोन वेळच्या भुकेच करायचं काय म्हणून त्या शेत मजुरी करणाऱ्या कुटुंंबाने जीवन संपवण्याच्या उद्देशाने विहीरीत उडी मारली.तिथेच शेतात काम करणाऱ्या तरुणाच्या कानावर या उडी मारणाऱ्या कुटुंबाचा आक्रोश पडला.. त्याने मग क्षणाचाही विलंब न लावता स्वतःचा जीव धोक्यात घालत विहिरीत उडी मारत या चौघांना जीवदान दिले.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला. ।मात्र या कोरोनामुळे खूप कुटुंबांना आर्थिक फटका बसला. याच नैराश्यामुळे आत्महत्या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. शेतमजुरीच्या कामासाठी संगमनेरहुन जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे आलेल्या कुटुंबाने  केला. पतीने आपल्या पत्नी अन् दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला.मात्र एका तरुणाने प्रसंगावधनता दाखवल्याने या चार जणांचे जीव वाचले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. मूळचे संगमनेरच्या असलेल्या एक कुटुंब हाताला काही काम मिळेल या आशेने जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे आले होते. परंतु, जवळचे पैसे संपल्याने या कुटुंबाची अवस्था फार कठीण झाली होती. त्यामुळे आता यापुढे उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न उभा राहिल्याने या कुटुंबातील व्यक्तीने आपल्या पत्नी व दोन लहान जीवांसह विहिरीत उडी घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथेच शेतात काम करत असलेल्या दीपक सूर्यवंशी या तरुणाला या चौघांचा आक्रोश कानावर पडल्याने त्याने क्षणाचाही विलंब न करता धाडसी वृत्ती दाखवत तात्काळ विहिरीत उडी मारत या चौघांना बाहेर काढले. दैव बलवत्तर म्हणून ह्या तरुणामुळे कुटुंबाला जीवदान मिळाले.

टॅग्स :Junnarजुन्नरFamilyपरिवारcorona virusकोरोना वायरस बातम्या