शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक करणाऱ्याचा परवाना हाेणार रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 23:30 IST

प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक करणाऱ्या चालकाचा व वाहनाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.

- राहुल शिंदेपुणे : राज्यात गुटखा,पानमसाला आदी प्रतिबंधित पदार्थांची विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र,अवैध वाहतूक करून हे पदार्थ पुण्यासह महाराष्ट्रातील प्रमुख शहरामध्ये विक्रीसाठी आणले जातात. त्यामुळे या पुढील काळात प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक करणाऱ्या चालकाचा व वाहनाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.

    राज्यात गुटखा बंदीचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास अनेक अडचणी येत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये कर्नाटक, गुजरात आदी राज्यातून कोट्यावधी रुपयांचा गुटख्या पुणे शहर व परिसरात दाखल झाल्याचा घटना समोर आल्या आहेत. त्यातच पुणे शहरात अनेक ठिकाणी गुटख्याची अवैध विक्री होत असल्याचे बोलले जात आहे. गेल्या वर्षी अन्न व औषध प्रशासनातर्फे  75 ठिकाणी धाडी टाकून तपासणी करण्यात आली. त्यात 1 कोटी 19 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. तसेच काही महिन्यांपूर्वी शिरूर, बारामतीसह येरवडा,निगडी,पिंपरी चिंचवड परिसरात एफडीएकडून गुटख्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातही गुटख्याची अवैध वाहतुक व विक्री होत असल्याचे समोर आले आहे. केवळ ट्रक किंवा टेम्पोमधूनच नाही तर प्रवासी वाहतूक करणा-या बस मधूनही गुटख्याची वाहतूक होत असल्याचे एफडीएच्या कारवाईत अढळून आले आहे.

    गुटखा बंदीच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनासह एफडीएकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्याचा फारसा फायदा झाला नाही. त्यामुळे गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहानाचा वाहतूक परवाना आणि चालकाचा परवाना दोन्ही रद्द करण्याची कारवाई करण्यात यावी, याबाबत एफडीकडून शासनाकडे व परिवहन विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. तसेच या प्रस्तावास मान्यता मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात होता. शासनाने नुकताच हा प्रस्ताव मान्य केला आहे. त्यामुळे गुटखा,पानमसाला आदी प्रतिबंधीत मालाची वाहतूक करणा-यांवर परिवहन विभागाकडूनही कठोर कारवाई केली जाणार आहे.

    प्रतिबंधित अन्न पदार्थाची मोटर वाहनातून वाहतूक होत असल्याचे आढळल्याने प्रकरण न्यायालयात दाखल करावे. तसेच मोटर वाहन कायद्या कलम 19 (1)(सी)अन्वये वाहन चालकास वाहन चालविण्यापासून प्रतिबंधित करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्याला सुचित करावे, असे परिपत्रक अन्न व औषध प्रशासनक विभागाकडून काढण्यात आले आहे. प्रतिबंधित अन्न पदार्थाची वाहतूक करणारी वाहने राज्याच्या मोटर वाहन विभागाच्या सीमा तपासणी नाक्यावर किंवा इतर नियमित वाहन तपासणीच्या वेळी निदर्शनास आल्यास सीमा तपासणी अधिका-याकडून वाहनाच्या परवान्यावर कारवाईसाठी ताब्यात घेतले जाते. एफडीएच्या अधिका-यांनी संबंधित अधिका-यांशी संपर्क साधावा,असेही एफडीएच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेFDAएफडीएnewsबातम्याRto officeआरटीओ ऑफीस