शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

'' चला बोलुया '' च्या माध्यमातून 34 प्रकरणे निकाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 20:51 IST

पुण्यातील फॅमिली कोर्टात '' चला बोलूया''  हे वादपूर्व विवाहविषयक समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे

ठळक मुद्देसमुपदेशनातून जोडप्यांना मार्गदर्शन : वर्षभरात 260 प्रकरणे दाखल

पुणे : नवरा बायको यांच्यातील वाद, पोटगी संबंधीच्या तक्रारी, तसेच मुलांच्या ताब्याविषयीच्या प्रश्नावर समुपदेशनातून तोडगा काढण्याकरिता पुण्यातील फॅमिली कोर्टात '' चला बोलूया''  हे वादपूर्व विवाहविषयक समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या समुपदेशन केंद्रात समुपदेशकांच्याव्दारे तडजोडीतून ३४ प्रकरणे निकाली निघाली आहेत. केंद्रात गेल्या वर्षभरात २६० प्रकरणे दाखल झाली होती. वषार्पूर्वी  महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई उच्च न्यायालय आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन मुंबई हायकोटार्चे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते करण्यात आले.या केंद्रामध्ये वैवाहिक, कौटुंबिक स्वरुपाचे वाद प्रत्यक्ष कोर्टात दाखल होण्यापूर्वी उभय पक्षकारांचे मोफत समुपदेशन करून त्यांना पुन्हा एकत्र आणण्याचा किंवा त्यांच्यामध्ये परस्पर संमतीने तडजोड करण्याचा प्रयत्न केला जातो. या केंद्रात पती - पत्नीमधील वाद, पोटगी संबंधीचे वाद, मुलांच्या ताब्याचे वाद, पती पत्नीच्या मालमत्तेचे वाद या व्यतिरिक्त आई वडील, मुले यांच्यातील पोटगी किंवा सांभाळ करण्याबाबतचे वाद मिटविण्याचा प्रयत्न केला जातो.  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव चेतन भागवत यांच्याकडे या कें द्राची प्रशासकीय जबाबदारी आहे. मानसी रानडे, मीलन पटवर्धन, पूनम निंबाळकर, मधुगीता सुखात्मे, सविता देशपांडे, प्रशांत लोणकर, दिप्ती जोशी, नैना आठल्ये, जुही देशमुख हे तज्ञ समुपदेशक या केंद्रात सेवा देत असून केंद्राचे काम सुरळीत चालण्यासाठी महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. डी. कुलकर्णी, फॅमिली कोटार्चे प्रमुख न्यायाधीश ए. ए. शहापुरे हे मार्गदर्शन करतात. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालय