निरगुडेत जाऊ विरूद्ध जाऊ, तर शिवतक्रार येथे सासु विरूद्ध सुन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:25 IST2021-01-13T04:25:44+5:302021-01-13T04:25:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कानामागून आलीअन तिखट झाली. घरच झाल थोड; अन व्याह्यान धाडल घोडं. एकाच घरात तीन ...

Let's go against Nirgude, let's go against Shivsakrara | निरगुडेत जाऊ विरूद्ध जाऊ, तर शिवतक्रार येथे सासु विरूद्ध सुन

निरगुडेत जाऊ विरूद्ध जाऊ, तर शिवतक्रार येथे सासु विरूद्ध सुन

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कानामागून आलीअन तिखट झाली. घरच झाल थोड; अन व्याह्यान धाडल घोडं. एकाच घरात तीन तीन पदे. दिल्लीतील राजकारण गल्लीत, अशीच काहीशी राजकीय परिस्थिती आता गावागावात दिसु लागली आहे. निमित्त आहे ग्रामपंचायत निवडणुकीचे!

गाव लहान असले तरी कोण कुणाचा प्रचार करतोय, अनकोण कुणाला अस्मान दाखवतोय हे मतदारांना काय गावपुढात्यांनाही कळेनासे झाले आहे. अवघ्या दोन दिवसावर आलेल्या गावच्या निवडणूकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. त्यातून नात्या गोत्यातील संघर्षही शिगेला पोहचला आहे.

जिल्ह्यात जवळपास ६५० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी जिल्ह्यात सुरू आहे. या निवडणुकीत अनेक सख्ख्खे नातेवाईक ऐकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. या भावकिच्या राजकारणात गावाचे राजकारणही ढवळून निघाले आहे. काही ग्रामपंचायतीत भावा विरूद्ध भाऊ तर काही ठिकाणी जाऊ विरूद्ध जाऊ रिगंणात एकमेकांविरूद्ध उभे आहेत. तर काही ठिकाणी चक्क सासु विरोधात सुन तर काही ठिकाणी ननंद भावजय यांच्यात घरच्या प्रमाणे निवडणुक रिंगणातही संघर्ष पाहायला मिळत आहे.

निरा-शिवतक्रार येथील लढत

नीरा - शिवतक्रार ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या १७ जागांसाठी ३९ उमेदवार वेगवेगळ्या पँनल, आघाडीतून व अपक्ष आपली जनमताची ताकद आजमावत आहेत. नीरा - शिवतक्रार प्रभाग १ मध्ये सख्खे चुलते पुतणे तर प्रभाग ४ मध्ये सख्या चुलत सासू सुना आमने सामने नीरा ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत उभ्या ठाकल्या आहेत.

ढेकळवाडी लढत

ढेकळवाडी (ता. बारामती ) येथील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत पाच जणाची बिनविरोध निवड झाली आहे . या मध्ये तीन महिलाचा समावेश आहे. मात्र वार्ड क्र १ येथे ननंद विरुद्ध भाऊजय असा सामना रंगणार आहे या लडती कडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत . ढेकळवाडी ग्रामपंचायती साठी ११ जागेसाठी ३४ जणानी उमदेवारी अर्ज दाखल केले होते.

चित्तेगावची लढत चित्तेगावची लढत चित्तेगावची लढत

खेड तालुक्यातील महाळुंगे ग्रामपंचायत निवडणुकीत चुलते पुतणे व चुलती पुतणी एकमेकांच्या आमने - सामने रिंगणात आहेत. गेल्ल्या निवडणूकीत बिनविरोध झालेल्या महाळुंगे गावात यंदा चुरशीची लढत होत आहे. सरपंचपदाचे आरक्षण मतदानानंतर २२ जानेवारीला होणार आहे. यामुळे २६ जानेवारीचा राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचा बहुमान कुणाला मिळणार याकडे सर्व गावाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Let's go against Nirgude, let's go against Shivsakrara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.