शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोश्यारी व चंद्रकांत पाटील यांना त्यांची जागा दाखवून देऊ; RPI च्या कार्यकर्त्यांकडून खेड शिवापूर टोलनाका बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 16:14 IST

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणा

खेड शिवापूर : पुणे जिल्हा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध म्हणून रविवार दि. ११ रोजी खेड शिवापूर टोलनाक्यावर टोल बंद आंदोलन करण्यात आले. रविवारी आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी खेड शिवापूर टोलनाका बंद करून आंदोलनास सुरुवात केली. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. आरपीआयचे, प्रवीण ओव्हाळ तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जितेंद्र कोंडे यांनी आपल्या भाषणातून निषेध व्यक्त केला. 

हा  पुरोगामी महाराष्ट्र ज्यांनी घडवला, अशा महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या कोशारी व चंद्रकांत पाटील यांना त्यांची जागा दाखवून देऊ. भाजपच्या अनेक नेत्यांनी आपल्या मतपेट्या भरण्यासाठी समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला जात आहे. त्याला कदापिही यश येणार नाही. महापुरुषांना खालच्या पातळीवर टिका टिपण्णी करणे हे महाराष्ट्र कदापिही सहन करणार नाही. 

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले असतील किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचाराची ज्योत कायम आपल्या मनात तेवत ठेवणे हे आपले परमकर्तव्य आहे. त्यामुळे अशा महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांना विरोधात आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांचे सरकार पाडण्यासाठीची ताकद निर्माण केली पाहिजे. असे आवाहन उपस्थित कार्यकर्त्यांना यावेळेस करण्यात आले. यावेळी राजगड पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलtollplazaटोलनाकाbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीPoliticsराजकारणagitationआंदोलन