शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

Live In Relationship: आम्हाला ठरवू द्या ना कुणाबरोबर राहायचंय! पुण्यात समलिंगी तरूणींचा पहिलाच ‘लिव्ह इन’ करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 10:36 IST

दोघींपैकी एक कुणीतरी हा करार रदद करीत नाही तोवर त्यांच्यामधील हा ‘बॉण्ड’ कायम राहणार

पुणे : एक नागपूरची तर दुसरी गोंदियाची. ओळखीच्या नातेवाईकांच्या लग्न सोहळ्यात दोघींचे ‘लव्ह अँट फर्स्ट साईट’ झाले. मग मैत्री आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. इथे दोघी प्रेमात पडल्या ख-या; पण नेहमीप्रमाणे कुटुंबाने विरोध केला. त्यातील एकीला जीवे मारण्याच्या धमक्या सुरू झाल्या. दोघींनीही थेट पुणे गाठले अन शिवाजीनगर न्यायालयात या समलिंगी तरूणींनी स्वेच्छेने "लिव्ह इन ' मध्ये राहाण्यासंबंधी कायदेशीर करार केला. आता पोलीस, कुटुंब आणि जवळचे नातेवाईकही त्यांच्या संबंधाना आडकाठी करू शकणार नाहीत. जोपर्यंत दोघींपैकी एक कुणीतरी हा करार रदद करीत नाही तोवर त्यांच्यामधील हा ‘बॉण्ड’ कायम राहणार आहे.

मीनल आणि माधुरी (नाव बदललेली) या समलिंगी तरूणींची ही कहाणी आहे. मीनल ही 28 वर्षांची तर माधुरी 19 वर्षांची आहे. समलिंगी संबंधांना गुन्हा ठरविणारे भारतीय दंड संहितेचे कलम 377 हे सर्वोच्च न्यायालयाने रदद करून समलिंगी जोडप्यांना दिलासा दिला असला तरी त्यांचा लढा संपलेला नाही. कारण अजूनही समाजामध्ये समलिंगी संबंधांना स्वीकारण्याची मानसिकता तयार झालेली नाही. त्याचाच बळी या समलिंगी तरूणी ठरल्या आहेत.

मीनल म्हणाली, माधुरीच्या कुटुंबाचा आमच्या नात्याला विरोध होता. तिच्या कुटुंबाने कमी वयातच तिचं लग्न करायंच ठरवलं होतं. तेव्हा कुणाशी लग्न करायंच नाही. मला तुमच्यासोबत राहायचंय असं ती म्हणाली आणि घरातून पळून आली. आम्ही एकत्र राहाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, तिच्या कुटुंबांनी तिची हरवल्याची तक्रार केली आणि माझ्यावरच्या संशयातून केस केली. पोलीस तिच्या कुटुंबांच्या बाजूने होते. तिला कुटुंबासमवेत जाण्यासाठी जबरदस्ती करीत होते. मग आम्ही राईट टू लव्ह संस्थेसाठी काम करणा-या अभिजित कांबळे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी अँड विकास शिंदे यांच्याशी बोलणे करुन दिले. पोलिसांचे त्यांच्याशी बोलणे झाल्यानंतर पोलिसांनी माधुरी मर्जीने तिच्यासोबत जाऊ शकते. पण तिच्या कुटुंबियांनी मला मारण्याची धमकी दिली,त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे म्हणून आज आम्ही कायदेशीरपणे ‘लिव्ह इन’ मध्ये राहाण्याचा करार केला आहे. आम्ही समाजाचा किंवा पुढं काय होणार याचा विचार केलेला नाही.

आज दोघींनीही ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ चा करार केला आहे. दोघींनीही सहमतीने एकत्र राहाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना जर कुणाचा दबाव आला किंवा धमकी दिली तर त्यांना संरक्षण देण्यासाठी हा कायदेशीर करार करण्यात आला आहे. दोघींपैकी एकीला कुणी जबरदस्ती घेऊन गेले तर त्यातील एक जण पोलीस किंवा न्यायालयात जाऊन या कराराद्वारे संरक्षण मागू शकते. समलिंगी जोडप्यांना अद्यापही लग्नास कायदेशीर दृष्टीने मान्यता मिळालेली नाही. यासाठी सर्व धर्मांच्या कायद्यात बदल होणे आवश्यक आहे असे अँड विकास शिंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :marriageलग्नCourtन्यायालयWomenमहिलाrelationshipरिलेशनशिप