शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

कोणी मोठ्या बापाचा असू द्या, सोडणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:12 IST

खासगी सावकारांना सज्जड दम लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : खासगी सावकारकीच्या माध्यमातून कोणी गोरगरिबांना लुटत असेल तर त्याच्यावर ...

खासगी सावकारांना सज्जड दम

लोकमत न्यूज नेटवर्क

बारामती : खासगी सावकारकीच्या माध्यमातून कोणी गोरगरिबांना लुटत असेल तर त्याच्यावर तडीपार, मोक्कासारखी कारवाई करेन. कोणी मोठ्या बापाचा असू द्यात, कारवाईनंतर कुठला मायचा लाल चुकलं म्हणून माझ्याकडे आला तरी सोडणार नाही, असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासगी सावकारांना भरला.

बारामती येथील जिजाऊ भवन येथे बारामती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक श्रीनिवास बहूळकर यांच्या सेवापूर्तीनिमित्त सन्मान करण्यात आला. यावेळी पवार बोलत होते. पवार म्हणाले, मधल्या काळामध्ये खासगी सावकारीची प्रकरणे व त्यामधून झालेल्या आत्महत्या माझ्या कानी आल्या होत्या. नियमबाह्य व कायदे मोडून व्यावसाय करण्यापेक्षा चांगले व्यावसाय करा. अशा धंद्यांपासून बाजूला रहा. दादागिरी, मनगटशाहीच्या जोरावर कोणी सर्वसामान्य माणसाला लुटत असेल, तर त्याच्यावर कायद्याने जेवढी कडक कारवाई करत येईल तेवढी कडक कारवाई करण्यात येईल. मग तो कोणी का असेना माफी मागत आला तरी त्याला माफ करणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहर व तालुक्यातील खासगी सावकारांना गर्भित इशारा दिला.

तत्पूर्वी बारामती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक श्रीनिवास बहूळकर यांना सेवापुर्तीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. तसेच बहूळकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना बहूळकर म्हणाले, बारामती सहकारी बँकेमध्ये मागील ४१ वर्षांपासून लिपिक पदापासून काम केले. बँकेचे संचालक मंडळ, खातेदार यांच्या प्रेमामुळे आपण इतकी वर्षे कार्यरत राहिलो. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती बँकेचे चेअरमन श्रीकांत सिकची, उपाध्यक्ष अविनाश लगड, सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी व बँकेचे खातेदार उपस्थित होते.

पवार म्हणाले बारामती शहर व तालुक्यात अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत. त्यामध्ये कालवा सुशोभीकरण, शिवसृष्टी, चिंकारा पार्क, रस्ते, पूल, तीन हत्ती चौक सुशोभीकरण यामुळे बारामती शहराच्या सौंदर्यामध्ये भर पडणार आहे. यामध्ये कोणाची जागा जात असेल तर त्याला विरोध करू नका. अतिक्रमण केले असेल तर नियमाप्रमाणे ते काढण्यात येईल. शहराचा कायापालट होत असताना आपल्या काही कल्पना असतील तर नक्की आम्हाला कळवा. चांगल्या कल्पानांवर काम करता येईल. पालखी मार्गाच्या भूसंपादनासाठी ३५० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. लवकरच हे काम होणार आहे. तसेच शहरातील बसस्थानकाची इमारतदेखील नव्याने उभी करण्यात येणार आहे. राज्यातील पहिल्या पाच बसस्थानकामध्ये बारामतीचे बसस्थानक असेल यापद्धतीने काम केले जाणार आहे. मात्र ही विकासकामे होत असताना समाजातील कोणताही घटक त्यापसून वंचित राहणार नाही, याचीदेखील काळजी घेण्यात येणार आहे.

चौकट

आंतरराष्ट्रीय बाजारात २ हजार १०० रुपये साखरेचा दर झाला आहे. मात्र सध्या साखर विकली जात नाही. आरबीआयच्या माध्यमातून केंद्र सरकार सहकर क्षेत्रासमोर वेगवेगळ्या अडचणी निर्माण करीत आहे. सहकारावर बंधने आणली जात आहे. सहकार चळवळ मोडीत काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याबाबत पवार साहेबांसोबत चर्चा झाली आहे. यामधून मार्ग काढण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

चौकट

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे दिवस उगवल्यापासून त्यांच्या कामाचा झपाटा सुरू असतो. पवार यांच्या मनात आले तर अगदी सकाळी सहा वाजता एखाद्या विकासकामाची पहाणी करण्यासाठी ते पोहचतात. त्यामुळे साहजिकच संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांना पहाटेपासून संबंधित कामाच्या ठिकाणी थांबावे लागते. हाच धागा पडकून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘माझ्यामुळे अनेकांना सकाळी लवकर उठावे लागते. अधिकाºयांना सुट्टीच्या दिवशी देखील कामाच्या ठिकाणी पोहचावे लागते. या अधिकाºयांच्या बायका म्हणत असतील कुठून बारामतीत नोकरीला आलो’ अशा शब्दांत शासकीय अधिकारी व कर्मचाºयांना चिमटा काढला. यावर सभागृहातदेखील हशा पिकला.