शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पीएमपीचा ताफाही आता येऊ द्या पूर्ण क्षमतेने मार्गांवर;गर्दी टाळण्यासाठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 07:15 IST

अनलॉकमध्ये रेल्वे, विमान आणि आता एसटीद्वारे प्रवासी वाहतुक पूर्ण क्षमतेने वाहतुक सुरू केली आहे.

ठळक मुद्देपुण्यातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या पीएमपी बससेवेला

पुणे : एसटी बसमधूनही पूर्ण क्षमतेने प्रवासी नेण्यास नुकतीच मान्यता मिळाली आहे. रेल्वे, विमान व एसटीच्या वातानुकूलित गाड्यांमधून काही तासांचा प्रवास होतो. पीएमपी बसमधील प्रवास काही मिनिटांचाच असतो. बसमधून प्रवासी सतत चढ-उतार करत असतात. बस कमी असल्याने काही मार्गांवर सकाळी व सायंकाळी गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी बस वाढवून पूर्ण क्षमतेने वाहतुक सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे.

अनलॉकमध्ये रेल्वे तसेच विमानाद्वारे प्रवासी वाहतुक पूर्ण क्षमतेने वाहतुक सुरू आहे. एसटीने तोटा वाढू लागल्याने पूर्ण क्षमतेने प्रवासी घेण्यासाठी राज्य शासनाकडे मान्यता मागितली होती. त्याला हिरवा कंदील मिळाल्यानंतर शुक्रवारपासून एसटीमध्ये सर्व आसनांवर प्रवाशांना बसता येणार आहे. पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या पीएमपी बससेवेला मात्र हे बंधन अद्याप कायम आहे. शहरात कोरोनाबाधित वाढत असल्याचे कारण दिले जात आहे. पण सध्या बस कमी असल्याने काही मार्गांवर गर्दीतून प्रवास करावा लागत आहे. वाहकांकडून प्रवाशांना रोखले जात नाही. जादा बस नसल्याने प्रवासीही मिळेल त्या बसने प्रवास करतात. अशावेळी मार्गावर अधिकाधिक बस आणणे आवश्यक आहे.तसेच बसमध्ये मास्कचा वापर आणि नियमित सॅनिटायझेशन केल्यास पुर्ण क्षमतेने प्रवास शक्य आहे. एसटी, रेल्वे व विमानामध्ये वातानुकूलित यंत्रणा सुरू असते. यामध्ये संसर्गाची शक्यता अधिक असते. हा प्रवास काही तासांचा असूनही त्याला मान्यता आहे. मग पीएमपीचा प्रवास काही मिनिटांचा आणि हवेशीर असूनही मान्यता का दिली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.------------------कमी बस असल्याने सकाळी व सायंकाळी काही मार्गांवर गर्दी होते. त्यामुळे प्रशासनाने आता नफा-तोट्याचा विचार न करता बस वाढवायला हव्यात. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हायचा असेल आणि प्रवासी टिकवून ठेवायचे असतील तर सध्या तोटा सहन करायला हवा. बस वाढल्या तर हळु-हळु प्रवासीही वाढत जातील.- निहार थत्ते, प्रवासी------------------पुण्यात संसर्ग वाढत असल्याने पुर्ण क्षमतेने प्रवासी घेणे सध्या शक्य नाही. तसेच काही मार्गांवर गर्दीच्या वेळी बस वाढविल्या जात आहेत. पण प्रवासी प्रवासी वाढत नाहीत. आतापर्यंत सुमारे ५० बस वाढविल्या आहेत.- राजेंद्र जगताप, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी------------------     धायरी, वाघोली, सांगवी, कात्रज, हडपसर अशा काही मार्गांवर बसला गर्दी होते. आम्हीही काही बोलू शकत नाही. बसमध्ये सॅनिटायझर असले तरी गर्दी झाल्यावर उपयोग होत नाही. वाहकांना गर्दीतूनच फिरावे लागते. त्यामुळे अशा मार्गांवर आणखी बसची संख्या वाढवायला हवी, असे काही चालक व वाहकांनी सांगितले.----------

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलpassengerप्रवासीcorona virusकोरोना वायरस बातम्या