शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

होऊ दे खर्च! पुण्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवाराच्या खर्चाचे कोटीच्या कोटी उड्डाणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 10:43 IST

शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी हद्दीतील एका ग्रामपंचायती उमेदवारांने तब्बल 80 हजार वाटप केल्याची जोरदार चर्चा

ठळक मुद्देचांदीच्या वस्तु, महिन्याचा किराणसह मतला हजारो रुपयांचे वाटप 

सुषमा नेहरकर-शिंदेपुणे :  जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत चांदीच्या वस्तु, एक महिन्याचा किराण, पंधरा लिटर तेलाचे डबे, साड्यासह थेट मताला हजारो रुपयांचे वाटप करत पैशांचा अक्षरश : धुराळा उडाला. यात  शिरुर,  हवेली, खेड आणि मावळ, मुळशी तालुक्यातील एमआयडीसी क्षेत्रातील व मोठ्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा निवडणूक खर्च कोटींच्या घरात गेला आहे.

पुणे जिल्ह्यातील 649 ग्रामपंचायतीसाठी शुक्रवार (दि.15) रोजी मतदान झाले. यात राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत सदस्य संख्ये नुसार 15 हजार ते 75 हजार रुपये खर्च करण्यास मान्यता दिली आहे. परंतु आयोगाने दिलेल्या खर्चाच्या मर्यादा जिल्ह्यातील बहुतेक सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी ओलांडली आहे. हवेली , खेड, शिरूर आणि मावळ, मुळशी तालुक्यातील ग्रामपंचायत उमेदवारांचा खर्च तर एक ते पाच कोटींच्या घरात गेला आहे. खेड तालुक्यातील एका ग्रामपंचायत उमेदवाराने आपले निवडणूक चिन्ह असलेल्या बॅटच्या चांदीच्या प्रतिकृतीचे वाटप केले. जुन्नर तालुक्यात काही सदस्यांनी एक महिन्याचा किराण, पाच, 15 लिटर तेलाचे डबे, तर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर साड्या, विविध प्रकारची वाणांचे मोठ्याप्रमाणात वाटप करण्यात आले. निवडणुका जाहीर झाल्या पासून उमेदवारांकडून मोठ्याप्रमाणात मिष्टान्न व मासहार जेवणाच्या रोज पंगती उठवल्या जात होत्या. तर मतदानाच्या बहुतेक सर्व मोठ्या व चुरशीच्या ग्रामपंचायतीत अनेक सदस्यांनी थेट मतदारांना पैसे वाटप करण्यात आले. या एका मतासाठी पाचशे रुपयांपासून एक, दोन, तीन हजारसह थेट 20,25 हजार रुपयांचे देखील वाटप करण्यात आल्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत. तसेच मुंबई,  पुण्यातील मतदारांना गावाला घेऊन येणे आणि पुन्हा सोडण्यासाठी देखील विशेष सोय करण्यात आल्या होत्या. ------पुण्यासाठी 12 तर मुंबईसाठी 20 गाड्या जुन्नर तालुक्यातील एक ग्रामपंचायतीमधील उमेदवारांनी पुण्यातील आपले हक्काचे मतदारांना मतदानाला गावाला घेऊन येणे व पुन्हा सोडविण्यासाठी खास बंदोबस्त केला होता. यासाठी पुण्यासाठी 12 गाड्या तर मुंबईसाठी 20 गाड्यांची सोय करण्यात आली होती.------शिरूरमध्ये मताला 80 हजार शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी हद्दीतील एका ग्रामपंचायती उमेदवारांने तब्बल 80 हजार वाटप केल्याची जोरदार चर्चा गावांच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर एमआयडीसीतील एकाही ग्रामपंचायतीत मताला 20-25 हजारापर्यंत देखील वाटप झाल्याचे खात्रीच्या सुत्रांनी दिली.

टॅग्स :Puneपुणेgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकsarpanchसरपंचPoliticsराजकारणVotingमतदान