शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनाअभावी धरणांत कमी पाणीसाठा

By admin | Updated: March 30, 2017 00:02 IST

दिवसेंदिवस वाढत चाललेली उन्हाची तीव्रता आणि पावसाळा सुरू होण्यास अजून दोन ते अडीच महिने शिल्लक आहेत.

भोर : दिवसेंदिवस वाढत चाललेली उन्हाची तीव्रता आणि पावसाळा सुरू होण्यास अजून दोन ते अडीच महिने शिल्लक आहेत. मात्र, भोर तालुक्यातील भाटघर धरणात फक्त ३० टक्के, तर नीरादेवघर धरणात २६ टक्केच पाणीसाठ शिल्लक आहे. यामुळे धरणभागातील विहिरी, झरे व इतर पाण्याचे स्रोत आटल्यामुळे दोन्ही धरणभागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. टॅँकर सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. योग्य नियोजनाअभावी गतवर्षीच्या तुलनेत धरणात कमी पाणीसाठा राहिला आहे.मागील वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे भोर तालुक्यातील भाटघर व नीरा-देवघर ही दोन्ही धरणे ७० टक्केच भरली होती. तरीही नीरा-देवघर धरणात गतवर्षी ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. याउलट, या वर्षी दोन्ही धरणे १०० टक्के भरूनही पाण्याच्या योग्य नियोजनाअभावी धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. सध्या दोन्ही धरणांतून बारामती व फलटण या तालुक्यांतील डाव्या व उजव्या कालव्यांना शेतीसाठी १० मार्चपासून नीरा-देवघर धरणातून ७६० क्युसेक्सने, तर भाटघर धरणातून २,००० क्युसेक्सने पाणी नीरा नदीत सोडले आहे. दोन्ही धरणे १०० टक्के भरली होती. नीरा-देवघर धरणातही २६ टक्केच साठा शिल्लक आहे. ५ गावे व ५ वाड्या-वस्त्यांना टॅँकरची गरजनीरा-देवघर धरणभागातील रिंगरोड धारांबे, पऱ्हर खुर्द, पऱ्हर बुद्रुक, निवंगण, धानवली, शिरवली हि. मा., चौधरीवस्ती, मानटवस्ती तर महाड-पंढरपूर रोडवरील शिरगाव, सोमजाईवस्ती, सुईरमाळ, शिळींब, कुंड, कारुंगण यासह अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. जवळपास कुठेच पाणी उपलब्ध नसल्याने गावापासून ३ किलोमीटरवर असलेल्या धरणातून पाणी आणण्याशिवाय महिलांकडे कोणताच पर्याय नसल्याने पाण्यासाठी दिवसभर पायपीट सुरू आहे. दर वर्षी उन्हाळ्यात हेच काम महिलांना करावे लागत आहे. भोर पंचायत समितीकडे ५ गावे व ५ वाड्या-वस्त्यांनी टॅँकरची मागणी केली आहे. त्यामुळे त्वरित टॅँकर सुरू करण्याची मागणी लक्ष्मण दिघे व धोंडिबा मालुसरे यांनी केली आहे. पावसाळा सुरू होण्यास अद्याप अडीच महिने बाकी आहेत. तसेच, धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्याने दोन्ही धरणभागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.भाटघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणात असणाऱ्या विहिरींना पाणी कमी पडत असल्याने हर्णस, जोगवडी, आस्कवडी डेरे, म्हशीवली, कांबरे खुर्द, कुरुंजी यांच्यासह अनेक गावांतील विहिरीतील मोटर बंद पडत आहेत. त्यामुळे अनेक गावांत दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. तर, अनेकदा गाळमिश्रित पाणीपुरवठा होत आहे. दोन मोटरमुळे वीजबिल अधिक प्रमाणात येत आहे. नवीन पाईप घेणे, त्याला वायर व मजुरी ही कामे दर वर्षी उन्हाळ्यात करावी लागतात. मात्र, हे ग्रामपंचायतींना परवडत नाही. - ज्ञानेश्वर नलावडे, उपसरपंच, कुरुंजी