अर्ध्या महाराष्ट्रात कमी पाऊस ! मराठवाड्यात चांगला बरसला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 04:59 AM2020-08-02T04:59:03+5:302020-08-02T04:59:44+5:30

विदर्भात सर्वाधिक बॅकलॉग । मराठवाड्यात चांगला बरसला, ५ जिल्ह्यांत सर्वाधिक वृष्टी

Less rain in half of Maharashtra! | अर्ध्या महाराष्ट्रात कमी पाऊस ! मराठवाड्यात चांगला बरसला

अर्ध्या महाराष्ट्रात कमी पाऊस ! मराठवाड्यात चांगला बरसला

Next

पुणे : पावसाळ्यातील चार महिन्यांपैकी २ महिने सरल्यानंतरही राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून विदर्भातील ११ पैकी ९ जिल्ह्याचा त्यात समावेश आहे. नेहमी तहानलेल्या मराठवाड्यावर यंदा वरुणराजाने चांगलीच कृपादृष्टी ठेवली असून सर्व जिल्ह्यांत पावसाची सरासरी ओलांडली आहे. मध्य महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे.

जूनमध्ये पावसाने उशिरा सुरुवात केली असली तरी मान्सूनने १५ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला होता. तरीही विदर्भात सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण कमी होते. गेल्या दोन महिन्यात संपूर्ण राज्यात सरासरीच्या तुलनेत ४ टक्के अधिक पाऊस झाला आहेÞ त्याचवेळी विदर्भातील बुलढाणा व वाशिम वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. गोंदिया जिल्ह्यात सरासरीपेक्षा ४६ टक्के कमी पाऊस पडला आहेÞ तर अहमदनगर जिल्ह्यात सरासरीपेक्षा दुप्पटीहून अधिक पाऊस झाला आहे. कोकणातील पालघरमध्ये गेल्या वर्षी दोनदा अतिवृष्टी झाली होती. यंदा मात्र तेथे सरासरीपेक्षा ३० टक्के कमी पाऊस झाला आहेÞ नांदेड येथे सरासरी इतका पाऊस झाला आहे.


४ दिवस पावसाचे : पुढील चार दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

सरासरीपेक्षा सर्वांत कमी पाऊस गोंदिया ४६, नंदुरबार ३४, गडचिरोली २६, सातारा २९, भंडारा २२, यवतमाळ १९, पालघर ३०, रायगड १७, अकोला २०
कमी पाऊस : अमरावती १०, नागपूर ५, वाशिम ४, कोल्हापूर १४, पुणे व नाशिक २, ठाणे १८, चंद्रपूर २, वर्धा ४ सरासरीपेक्षा अधिक पाऊस : नांदेड ०, बुलढाणा १८, वाशिम २३, हिंगोली ११, सांगली ८, जळगाव २८, धुळे ५०, लातूर ३७, रत्नागिरी ६, सिंधुदुर्ग ३१, मुंबई उपनगर ४०, मुंबई शहर ३८, लातूर ३७, उस्मानाबाद ३०, परभणी २५ टक्के सर्वाधिक पाऊस : अहमदनगर ११६, सोलापूर ९२, औरंगाबाद १०९, बीड ९१, जालना ५७

Web Title: Less rain in half of Maharashtra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.