उदापुरात बिबट्याचे हल्ले सुरूच

By Admin | Updated: March 25, 2017 03:29 IST2017-03-25T03:29:18+5:302017-03-25T03:29:18+5:30

नगर-कल्याण महामार्गावरील उदापूर (ता. जुन्नर) येथील पाटील मळ्यातील सत्यवान सीताराम शिंदे यांच्या गोठ्यातील एक शेळी

Leopards attack in Udupur | उदापुरात बिबट्याचे हल्ले सुरूच

उदापुरात बिबट्याचे हल्ले सुरूच

ओतूर : नगर-कल्याण महामार्गावरील उदापूर (ता. जुन्नर) येथील पाटील मळ्यातील सत्यवान सीताराम शिंदे यांच्या गोठ्यातील एक शेळी, एक बोकड बिबट्याने काल (दि. २३) हल्ला करून ठार मारले, अशी माहिती वनक्षेत्रपाल एस. एस. रघतवान यांनी दिली.
ओतूरचे वनरक्षक एस. जी. मोमीन यांनी घटनास्थळाला भेट देऊन रीतसर पंचनामा केला आहे. सत्यवान शिंदे यांनी गोठ्यात शेळी व बोकड बांधले होते. बिबट्याने शेळीला जागीच ठार केले तर बोकडाला गोठ्यापासून दूर शेतात नेऊन अर्धा खाऊन टाकला. तीन दिवसांपूर्वी बिबट्याने याच ठिकाणी कुत्रेही मारले होते. सत्यवान शिंदे यांनी तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे उदापूर परिसरात पुन्हा दहशत निर्माण झाली आहे. उदापूर परिसरात बिबट्याने दुचाकीस्वारांवर हल्ले करून जखमी केल्याच्या घटना तीन-चार महिन्यांपूर्वी घडल्या होत्या.

Web Title: Leopards attack in Udupur