बिबट्या पकडणारच; पण खबरदारीही घ्या
By Admin | Updated: May 11, 2017 04:08 IST2017-05-11T04:08:40+5:302017-05-11T04:08:40+5:30
बिबट्या पकडण्यासंदर्भात ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केल्याने वनविभागाने गंभीर पावले उचचली आहेत. वनविभागाच्या वतीने

बिबट्या पकडणारच; पण खबरदारीही घ्या
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव भीमा : बिबट्या पकडण्यासंदर्भात ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केल्याने वनविभागाने गंभीर पावले उचचली आहेत. वनविभागाच्या वतीने गावामध्ये दवंडी देऊन जनजागृती करण्यात आली. यामध्ये नागरिकांना विविध प्रकारच्या सूचना करण्यात आल्या आहेत. बिबट्याचे हल्ले नैसर्गिक आपत्ती असल्याने वनविभागाबरोबरच पोलीस, महसूल, ग्रामसेवक हे एकत्र आले, तर बिबट्या जेरबंद होण्यास मदत मिळणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार ढमढेरे यांनी सांगितले.
शिरूर वनपरिक्षेत्राचा तुषार ढमढेरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वढू बुद्रुक येथील रतन भंडारे यांची भेट घेत त्यांच्यावर झालेल्या औषधोपचाराचा सर्व खर्च वनविभाग देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर गावातील प्रत्येक वस्तीवर जाऊन त्यांनी नागरिकांना खबरदारीच्या उपाययोजना सांगितल्याने नागरिकांचे मनोधैर्य उंचावण्यास मदत झाली आहे. या वेळी ढमढेरे यांच्यासह वनपाल बी. आर. वाव्हळ, वनरक्षक सोनल राठोड, ग्रामपंचायत सदस्य सचिन भंडारे, माजी सदस्य संजय भंडारे, सोसायटीचे माजी अध्यक्ष कुंडलिक भंडारे, स्मृती समितीचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे, अशोक भंडारे, श्रीकृष्ण गुरव, राहुल भंडारे उपस्थित होते.
वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार ढमढेरे यांनी सांगितले, की शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेतात एकट्याने
न जाता समूहाने जावे, शेतात जाताना सोबत फटाके किंवा मोठ्या
आवाजात मोबाईलवर गाणी लावावीत, हातात काठी व बॅटरी असावी, महिलांनी शेतात काम करताना विरुद्ध दिशेकडे तोंड करून काम करावे, जेणेकरून बिबट्याची हालचाल लक्षात येईल, अशा
विविध प्रकारच्या सूचना नागरिकांना करण्यात आल्या. तीन पिंजरे वढूक्षेत्रात लावले असून इन्फ्रारेड
कॅमेरे बसविण्याबाबत कार्यवाही
सुरू केली आहे. रात्र गस्तीसाठी अधिक कर्मचारी तैनात केले
आहेत.