शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : बेल्हे-कळस रस्त्यालगतच्या विहिरीतून बिबट्याला सुखरूप काढले बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 19:18 IST

वनविभाग व स्थानिक नागरिकांनी बिबट्याला दिले जीवदान ..

बेल्हे (पुणे) : बेल्हे (ता.जुन्नर)  येथील बेल्हे-कळस रस्त्यालगत असणाऱ्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवार (दि.४) हौदबाग परिसरात एका विहिरीत पडलेल्या बिबट्यास वनविभागाने रेस्क्यू टीमच्या मदतीने विहिरीत पिंजरा सोडून सुरक्षित बाहेर काढले. दरम्यान या बिबट्यास वनविभागाच्या वतीने माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रात हलवण्यात आले आहे.

हरकचंद बोरा यांच्या शेताजवळील विहिरीत अंदाजे दीड वर्षे वयाचा एक बिबट्या पडला असल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. संबंधितांनी ही माहिती तातडीने वनविभागाला कळवली. यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी विहिरीच्या कठड्याभोवती नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. दरम्यान भक्षाचा पाठलाग करताना अथवा रस्ता क्रॉस करताना वाहनांच्या आवाजामुळे घाबरून रात्रीच्या वेळी हा बिबट्या विहिरीत पडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बिबट्या विहिरीत पोहून दमल्याने तो विद्युत मोटारीच्या पाईपचा आधार घेण्याचा प्रयत्न करीत होता. ग्रामस्थांनी दोर बांधून चौपाई विहिरीत सोडल्यानंतर हा बिबट्या चौपाईवर विसावला होता. दरम्यान वनविभागाने रेस्क्यू टीमच्या मदतीने विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढले. दरम्यान या बिबट्यास वनविभागाच्या वतीने माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रात हलवण्यात आले असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्या