शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Video: जुन्नर तालुक्यात बिबट्यांची दहशत; रस्त्यातच ३ बिबट्यांचा मुक्तसंचार, नागरिकात भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 17:58 IST

वनविभागाने बिबट्यांच्या वाढत्या संख्येला रोखण्यासाठी लवकरात लवकर नियोजन करावे, ग्रामस्थांची मागणी

आळेफाटा : शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास एकाचवेळी तीन बिबट्यांचा मुक्तसंचार पाहून नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. शेतात चाललेल्या शेतकऱ्याने ते सगळं मोबाईलमध्ये कैद केलं. संबधित शेतकरी ट्रॅक्टरमध्ये असल्याने तो बचावला. ही घटना जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरातील मोरया हॉस्पिटल जवळील आहे. 

जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत वाढली असल्याच्या रोज नव्याने पाहायला मिळत आहे. बिबट्यांचे मानवी हल्ले किंवा पाळीव प्राणी हल्ल्यांचे प्रमाणही वाढत आहे. आळेफाटा परिसरात मोठ्या रहिवाशी इमारती झाल्या आहेत. बिबट्यांची संख्या वाढत असल्यामुळे नव्याने जन्म झालेले बछडे अन्न व पाण्याच्या शोधात थेट आळेफाटा परिसरात येत आहेत. मात्र आळेफाटा परिसरात दाखल झालेले बिबट्या पकडण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. ३ बिबटे उभे असलेला हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाल्यानंतर नागरिक घाबरले असून वन विभागाला त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

महिला शेतकऱ्यांना गमवावा लागतोय जीव 

जुन्नर परिसरात बिबट्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महिला राखणदार शेतात गेल्यावर बिबट हल्ला होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी दोन महिलांनी बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावला होता. शेतकरी आणि जुन्नर तालुकयातील नागरिक सध्यस्थितीत भयभीत झाले आहेत. दिवसाढवळ्या अथवा रात्रीही बिबट्याचे हल्ले होताना दिसत आहेत. महिला, लहान मुलांबरोबरच इतरांचाही जीव धोक्यात असल्याचे समोर आले आहे. वनविभागाने बिबट्यांच्या वाढत्या संख्येला रोखण्यासाठी लवकरात लवकर नियोजन करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.   

टॅग्स :PuneपुणेJunnarजुन्नरleopardबिबट्याforest departmentवनविभागenvironmentपर्यावरणNatureनिसर्ग