शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर तालुक्यातील बिबट्या अखेर जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 00:19 IST

पुरंदर तालुक्यातील उदाची वाडीपासून एक किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कपारीत लपलेल्या बिबट्याला वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या मदतीने पकडण्यात यश आले.

सासवड - पुरंदर तालुक्यातील उदाची वाडीपासून एक किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कपारीत लपलेल्या बिबट्याला वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या मदतीने पकडण्यात यश आले.याबाबत माहिती अशी की, स्थानिक ग्रामस्थ काळूराम कुंभारकर यांना बिबट्या डोंगर कपारीत लपल्याचे आढळून आल्यानंतर त्यांनी चौकसपणे पाहणी केली. तेव्हा त्यांना चिंकारा जातीच्या काळवीटाची शिकार झाल्याचे दिसले. कुंभारकर यांनी ग्रामस्थांना ही माहिती दिल्यानंतर ग्रामस्थ डोंगराच्या परिसरात बिबट्या पाहण्यासाठी गेले. यावेळी त्यांना जवळच काळवीट मरून पडल्याचे दिसले. बिबट्या मात्र डोंगराच्या कपारीत लपल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. याची खबर तात्काळ ग्रामस्थांनी वन विभागाकडे कळवली. वनविभागाचे अधिकारी तातडीने या ठिकाणी पोहोचले.बिबट्याची खात्री करून कात्रज येथून रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. सुरुवातीला पिंजरा लावून जाळे टाकून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, चवताळलेल्या बिबट्याने दोन कर्मचाºयांवर हल्ला केला. यात दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांची नावे समजू शकली नाहीत.बिबट्याला पकडण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ झाल्यानंतर डॉटच्या साहाय्याने बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. २ वर्षे वयाची व ४५किलो वजनाची ही मादी आहे. यावेळी मोबाईल अथवा कॅमेºयांमधून छायाचित्र अथवा व्हिडीओ घेण्यास मनाई करण्यात आली होती. बिबट्याचा वावर असलेल्या एक किलोमीटरच्या परिघात कोणालाही येण्यास मनाई होती.ही कारवाई दुपारी ३.३० पासून रात्री ७.३० पर्यंत सुरू होती. बिबट्याला जेरबंद केल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पकडलेल्या बिबट्याला ताम्हिणी परीसरातील जंगलात सोडण्यात येणार असल्याचे रेस्क्यू टीमने सांगितले.

टॅग्स :leopardबिबट्याPuneपुणे