मंगरूळ येथे बिबट्या जेरबंद

By Admin | Updated: May 7, 2016 05:10 IST2016-05-07T05:10:27+5:302016-05-07T05:10:27+5:30

येथील हाडकी हाडवळा परिसरात वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात शुक्रवारी (दि. ६) पहाटे नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला. या परिसरातील ही दुसरी घटना आहे.

Leopard Martyr in Mangalore | मंगरूळ येथे बिबट्या जेरबंद

मंगरूळ येथे बिबट्या जेरबंद

बेल्हा : मंगरूळ (ता. जुन्नर) येथील हाडकी हाडवळा परिसरात वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात शुक्रवारी (दि. ६) पहाटे नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला. या परिसरातील ही दुसरी घटना आहे.
हाडकी हाडवळा परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य आहे. या भागातील लोकांना बिबट्याचे केव्हाही दर्शन होत होते. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. लहान मुलांना ग्रामस्थ स्वत:ची कामे बाजूला ठेवून गाडीवरून शाळेत पोहोचवत आहेत. या परिसरातील आंबेविहीर येथे दि. ११ फेब्रुवारी २०१६ रोजी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात कविता कुंभार (वय ३२) या जखमी झाल्या होत्या. त्यानंतर खराडेमळा येथे दि. १६ एप्रिल २०१६ रोजी शेतात जनावरांसाठी चारा कापणाऱ्या सगुणाबाई खराडे (वय ५५) यांना दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घालून उसाच्या शेतात ओढत नेऊन जागेवरच ठार केले होते. त्यानंतर वन खात्याने या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले होते. परिसरातीस कुत्री, रानडुकरे तसेच पाळीव जनावरांवर बिबट्याचे हल्ले चालूच आहेत.
पिंजरे लावूनही बिबट्या जेरबंद होत नव्हता. वन खात्याचे कर्मचारीही हतबल झाले होते. मात्र, त्यानंतर दि. १७ एप्रिल २०१६ रोजी
आंबेविहीर परिसरात वन खात्याने संजय चिमाजी लामखडे यांच्या
शेतात पिंजरा लावला होता. त्या ठिकाणी पूर्ण वाढ झालेली बिबट्याची मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली होती. यानंतर शुक्रवारी (दि. ६) पहाटे नर जातीचा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. त्याचे वय अंदाजे १२ वर्षे आहे. वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला माणिकडोह निवारा केंद्रात हलविले.

Web Title: Leopard Martyr in Mangalore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.