वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:09 IST2021-06-22T04:09:10+5:302021-06-22T04:09:10+5:30

या बिबट्याचे वय अंदाजे एक वर्ष असून तो नर जातीचा आहे. आंबेगाव तालुक्यातील कळंब, लौकी, चास, चांडोली या परिसरात ...

Leopard killed in vehicle crash | वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

या बिबट्याचे वय अंदाजे एक वर्ष असून तो नर जातीचा आहे.

आंबेगाव तालुक्यातील कळंब, लौकी, चास, चांडोली या परिसरात बिबट्यांचा नेहमीच मोठ्या प्रमाणावर वावर असतो. रविवार रात्री ११च्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरील कळंब-नारायणगाव सरहद्दीवर रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असलेल्या बिबट्याला वाहनाने धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती बिबट्या रेस्क्यू पथकाचे सदस्य राजेंद्र आल्हाट यांना दिली. वनपाल नारायण आरुडे, वनपाल विजय वेलकर, कैलास दाभाडे व अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत बिबट्याला ताब्यात घेतले आहे. सोमवारी सकाळी कळंब पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित पऱ्हाडेकर यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांच्या उपस्थितीत पेठ अवसरी घाट येथे वन विभागामार्फत पंचनामा केल्यानंतर बिबट्याचे अग्नी दहन करण्यात आले आहे.

Web Title: Leopard killed in vehicle crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.