दावडीत बिबट्याने केला दोन मेंढ्या फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:06 IST2021-02-05T05:06:11+5:302021-02-05T05:06:11+5:30
दावडी परिसरातील डुंबरेवस्तीवर गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याने दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. या परिसरात बिबट्याला लपण्यासाठी जागा, तसेच ऊसक्षेत्र ...

दावडीत बिबट्याने केला दोन मेंढ्या फस्त
दावडी परिसरातील डुंबरेवस्तीवर गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याने दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे.
या परिसरात बिबट्याला लपण्यासाठी जागा, तसेच ऊसक्षेत्र असल्याने या ठिकाणी वस्ती केली आहे. दोन दिवसांपूर्वी जनावरांच्या गोठ्यात शिरण्यापर्यंत बिबट्याने मजल मारली होती. मात्र, जनावरांचा ओरडण्याच्या आवाजाने शेतकरी जागे होऊन बिबट्याला हुसकावून लावले. वनखात्याने या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. मात्र, बिबट्या पिंजऱ्याकडे फिरकत नसल्यामुळे या परिसरातील शेतकरी चिंतेत आहे. काल (रविवारी) रात्रीच्या सुमारास संतोष टुले या मेंढपाळाच्या वाड्यावरील दोन मेंढ्यांवर हल्ला केला. त्यामध्ये एका मेंढीचे पोट फाडून गळ्याला गंभीर जखमा केल्या आहे. तसेच दुसऱ्या मेंढीलाही जखमी केले अशी माहिती ग्रामपंचायत सदस्या राणी डुंबरे यांनी दिली. या हल्ल्यामुळे बिबट्याची या परिसरात दहशत निर्माण होऊन शेतकरी व महिला वर्ग शेतात काम करण्यासाठी धजावत नसल्याचे चित्र दिसत आहे.
--