ऊसतोडणी सुरू आढळून आले बिबट्याचे पिल्लू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:04 IST2021-02-05T05:04:03+5:302021-02-05T05:04:03+5:30
माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य विशाल करंडे, सचिन नरे, नवनाथ करंडे, भीमाशंकर कारखान्याचे कर्मचाऱ्यांनी सदर ठिकाणी येऊन पाहणी केली. ऊसतोडणी ...

ऊसतोडणी सुरू आढळून आले बिबट्याचे पिल्लू
माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य विशाल करंडे, सचिन नरे, नवनाथ करंडे, भीमाशंकर कारखान्याचे कर्मचाऱ्यांनी सदर ठिकाणी येऊन पाहणी केली. ऊसतोडणी थांबवून वनरक्षक एस.एन.अनासुने यांना घटनेची माहिती देण्यात आली. ही माहिती मिळताच अनासुने व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बछडा ताब्यात घेतला. तो ज्या ठिकाणी सापडला आहे त्या ठिकाणी सोडून दिला. या बछड्याला बिबट्याची मादी घेऊन जाईल तोपर्यंत त्यावर लक्ष ठेवण्यात येनार आहे.आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र असल्याने बिबट्याचा वावर जास्त आहे .काल पारगाव याठिकाणी बछडा आढळून आला होता .उपासमारीमुळे त्या बछड्याचा मृत्यू झाला. जारकरवाडी येथे बिबट्या जेरबंद झाला.त्यामुळे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असणाऱ्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या घर व गोठे यांना बिबट्यापासून संरक्षण व्हावे म्हणून संरक्षण जाळी देण्यात यावी अशी मागणी विशाल करंडे यांनी केली आहे.