वडगाव रासाईत सापडले बिबट्याचे बछडे
By Admin | Updated: November 14, 2016 02:38 IST2016-11-14T02:38:48+5:302016-11-14T02:38:48+5:30
वडगाव रासाईत सापडले बिबट्याचे बछडे

वडगाव रासाईत सापडले बिबट्याचे बछडे
रांजणगाव सांडस : वडगाव रासाई (ता. शिरूर)येथील जयराम अण्णा खळदकर यांच्या वडगाव रासाई व सादलगाव शिवेशेजारील ऊसशेतात घोडगंगा साखर कारखान्याची ऊसतोड चालू आहे. सकाळी या शेतात ऊसतोड कामगार ऊसतोड करत असताना लहान लहान बिबट्याची २ मादी व १ नर जातीची पिल्ले त्यांना दिसली.
याबाबतची माहिती जयराम खळदकर यांना दिली. सर्व ऊसतोड कामगार भयभीत झालेले होते. कारण या ठिकाणी त्या पिल्लांची मादी (आई) नव्हती. वाऱ्यासारखी बातमी गावात पसरली. या परिसरात ऊस मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे या भागात बिबट्याची संख्या किती आहे हे सांगता येत नाही. कारण या भागात अनेकांना बिबट्याचे दर्शन झालेले आहे.
ऊस शेतकरी जयराम खळदकर यांनी वनविभागाशी भ्रमणध्वनीवरून माहिती दिली.
ठिकाणी पाहणी करताना ग्रामपंचायत सदस्य सचिन शेलार, युवा उद्योजक रत्नकांत खळदकर.. आणि बबलू पाटील शेलार, प्रकाश ढवळे आदी नागरिक बिबट्याची पिल्ले पाहण्यासाठी गर्दी केली होती.(वार्ताहर)