धामारी येथे बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:09 IST2021-02-08T04:09:33+5:302021-02-08T04:09:33+5:30
धामारी येथील येथे रस्त्याच्या कडेला एक बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत पडल्याची माहिती शिरूर वनपरीक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना ...

धामारी येथे बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू
धामारी येथील येथे रस्त्याच्या कडेला एक बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत पडल्याची माहिती शिरूर वनपरीक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना मिळाली. त्यानंतर शिरूर वनविभागाच्या वनपाल चारूशीला काटे, प्रवीण क्षीरसागर, वनरक्षक हृषीकेश लाड, अभिजित सातपुते, वनमजूर हनुमंत कारकुड, वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे शेरखान शेख, श्रीकांत भाडळे, कात्रज उद्यान रेस्क्यू टीमचे रमेश हरिहर यांनी त्या पाहणी केली. घटनास्थळाचा पंचनामा करत असतांना वनाधिकाऱ्यांना मोठ्या बिबट्यांच्या तसेच लहान बछड्यांच्या पायाचे देखील ठसे आढळून आले. दोन बिबट्याच्या भांडणादरम्यान बिबट्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला. यावेळी धामारीचे पोलीस पाटील आत्माराम डफळ, माजी सरपंच कैलास डफळ, गुलाब डफळ, विकास निर्मळ, रामदास शिंदे यांसह आदी उपस्थित होते,
कोट
वनविभागाच्या वतीने नागरिकांना रात्रीच्या वेळी बाहेर पडू नये, जनावरांच्या शेजारी निवारा करावा, रात्रीच्या वेळेस लाईटचा वापर करावा, शेतात जाताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मृत बिबट्याच्या बछड्याचा नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्याने मृत्यू झाला आहे. मृत बछड्याचे अग्निदहन करण्यात आले आहे.
-मनोहर म्हसेकर, शिरूर वनपरीक्षेत्र अधिकारी
फोटो : धामारी येथे आढळलेला बिबट्याचा बछडा.