शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

ओतुरला ५२ वर्षीय महिलेवर बिबट हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 18:36 IST

ओतूर येथील तांबेमळा येथे बिबट्याने हल्ला करून त्यांना जखमी केले.

ओतूर : जुन्नर तालुक्यातील ओतूर तांबेमळा नं २ येथे बिबट्याने मोटरसायकलवरून घरी जात असताना महिलेवर हल्ला करून जखमी केले असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. अधिक माहिती अशी की शुक्रवारी (दि. २१) फेब्रुवारी रोजी ज्योती राजेश ढमाले (वय ५२ रा. तांबेमळा नं २, ओतूर ता. जुन्नर) या रात्री मोटारसायकल वरून जात असताना ९.४५ वाजता त्यांच्यावर ओतूर येथील तांबेमळा येथे बिबट्याने हल्ला करून त्यांना जखमी केले.यावेळी त्यांना तात्काळ ओतूर प्राथमिक केंद्रात दाखल करून प्राथमिक उपचार घेऊन पुढील उपचारासाठी नारायणगाव ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उपचार करण्यात आले. परंतु त्या हल्ला झाल्यानंतर मोटरसायकलवरून खाली रस्त्यावर पडल्यामुळे त्यांना डोक्याला मार लागला त्यामुळे सिटीस्कॅन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे नेण्यात आले.सिटीस्कॅन केल्यानंतर पुढील उपचारासाठी वायसीएम पुणे या ठिकाणी घेऊन जाण्यास सांगितले नंतर तात्काळ त्यांना वायसीएम पुणे या ठिकाणी हलविण्यात आले व तेथे त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात आले. ओतूर तांबेमळा येथे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी तात्काळ वनविभागाचे पथक दाखल होऊन वनपाल एस. एम. बुट्टे, वनरक्षक व्ही. ए. बेले, किशन केदार, फुलचंद खंडागळे, साहेबराव पारधी व रेस्क्यू टीम यांनी सदर ठिकाणी पिंजरा लावून बिबट वन्य प्राण्याबद्दल माहिती देऊन स्वसंरक्षणार्थ उपाययोजना सांगून जनजागृती करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडleopardबिबट्या