शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 15:39 IST

डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यानजीक असणा-या उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने ढोबळे यांच्यावर पाठीमागुन थेट हल्ला करत त्यांना जखमी केले.

आंबेगाव (निरगुडसर): आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील जारकरवाडी (ढोबळेवाडी) येथील शेतकरी रामभाऊ नारायण ढोबळे यांच्यावर बिबट्याने हल्ला  करुन जखमी केल्याची घटना सोमवारी (दि.१)सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,रामभाऊ नारायण ढोबळे यांच्यावर सध्या पुणे येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरू असुन त्यांची प्रकृती स्थिर आहे. आपल्या शेतातली दैनंदिन कामे आटपुन ढोबळे हे घराकडे परतत होते.डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यानजीक असणा-या उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने ढोबळे यांच्यावर पाठीमागुन थेट हल्ला करत त्यांना जखमी केले.या भयानक प्रसंगी ढोबळे यांनी घाबरुन न जाता आरडाओरडा करत बिबट्याचा प्रतिकार केला.त्यांच्या या प्रतिहल्ल्याने बिबट्याने शेजारच्या उसाच्या शेतात धुम ठोकली.यापुर्वी देखील बिबट्याने धनु धोंडिबा पाचपुते,विलास निवृत्ती पाचपुते,रामचंद्र नारायण ढोबळे,शिवराम रखमा ढोबळे यांच्या गाईच्या गोठ्यावर हल्ला करुन कालवडींचा फडशा पाडला होता.या परिसरात सध्या अशा घटना सतत घडत असल्याने दिवसाही लोकं शेतात काम करण्यास घाबरत आहेत.त्यात दिवसाचे लोडशेडिंग मुळे रात्री पिकांना पाणी द्यावे लागते.

.अशा भयभीत वातारणात किमान दिवसा लाईट उपलब्ध करून द्यावी आणि या परीसरात बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावावेत अशी मागणी भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र ढोबळे, सरपंच रुपाली भोजणे, जारकरवाडी गावचे उपसरपंच श्री. बाळासाहेब ढोबळे, ग्रामपंचायत सदस्या,डॉ.मनिषा ढोबळे,नंदा लबडे,माजी उपसरपंच श्री.सचिन टाव्हरे,माजी सरपंच मनिषा ढोबळे यांनी केली आहे.---------------------------------------------बिबट्याने हल्ला केल्यानंतर रूग्णास प्रतिबंधक लस घ्यावी लागते मात्र हि लस ग्रामीण भागामध्ये उपलब्ध नाही.परिणामी रूग्णास पुण्यासारख्या ठिकाणी न्यावे लागते.त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात मंचर उपजिल्हा रूग्णालयात हि लस उपलब्ध करण्यात यावी.अशी मागणी मुख्याध्यापक रोहिणी ढोबळे यांनी केली आहे.---------------------------------------------

टॅग्स :ambegaonआंबेगावleopardबिबट्याFarmerशेतकरी